---Advertisement---

…म्हणून गौतम गंभीरचा विरोध करत आहेत दिग्गज भारतीय तिरंदाज; पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही लिहले पत्र

---Advertisement---

भारताचा माजी दिग्गज क्रिकेट खेळाडू व सध्याचा पूर्व दिल्लीचा खासदार गौतम गंभीर आणि भारतातील प्रमुख तिरंदाज खेळाडू यांच्यामध्ये वादाची ठिणगी पेटली आहे. वादाचं कारण आहे 2020 कॉमनवेल्थ खेळांसाठी बनवण्यात आलेले तिरंदाजीचे पविलियन सेंटर व ट्रेनिंग सेंटर. गंभीरच्या मते या ट्रेनिंग सेंटरला भारताचे माजी दिग्गज क्रिकेट कर्णधार अनिल कुंबळे यांचे नाव देण्यात यावे. यासाठी गंभीरने पत्र लिहून तशी परवानगी देखील मागितली आहे. मात्र गंभीरच्या प्रस्तावाला तिरंदाजी संघ व खेळाडूंनी तीव्र विरोध केलेला आहे. तिरंदाजी संघाचे प्रमुख असलेले केंद्रीय मंत्री अर्जुन मुंडा यांनी देखील खेळाडूंच्या बाजूने आपले मत असल्याचे स्पष्ट केले आहे.

तिरंदाज खेळाडूंच्या मते या ट्रेनिंग सेंटरला सुप्रसिद्ध तिरंदाज लिंबा राम यांचे नाव देण्यात यावे. यासाठी दीपिका कुमारी, अतानु दास, तरुणदीप राय, जयंत तालुकदार आणि बोम्बायला देवी यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदींना पत्र लिहिले आहे.

भारतातील दोन सर्वोत्तम तिरंदाज खेळाडूंपैकी असलेल्या अनातू दास व दीपिका कुमारी यांनी देखील या संदर्भात आपले मत मांडले आहे. एका वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत दीपिका कुमारी म्हणाली की तिने खेळाची सुरुवात यमुनाबाई स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये केलेली आहे. हे तिच्या मनाच्या अतिशय जवळ आहे. लिंबा सर भारतीय तिरंदाजी इतिहासातील सर्वोत्तम खेळाडूंपैकी एक आहेत. त्यामुळे ट्रेनिंग सेंटरला त्यांचे नाव देण्यात यावे. अनातू दास यांनीदेखील दीपिका प्रमाणेच लिंबा राम यांचेच नाव सुचवले आहे.

लिंबा राम हे भारताचे माजी दिग्गज तिरंदाज आहेत. लिंबा राम हे मूळचे राजस्थान येथील आहेत. त्यांनी तीन वेळा भारताचे ऑलम्पिकमध्ये प्रतिनिधित्व केलेले आहे. 2012 झाली त्यांना पद्म सन्मान देखील देण्यात आलेला होता. हे बघणे उत्सुकतेचे ठरेल की या प्रकरणासंदर्भात आगामी काळात काय निर्णय घेतला जातो.

महत्त्वाच्या बातम्या –

एक अविस्मणीय क्रिकेट सामना! ४५ धावांवर बाद होऊनही इंग्लंडने मिळवला होता शानदार कसोटी विजय

क्रिकेट प्रमाणे फुटबॉलमध्येही असणार कन्कशन सब्सटिट्यूट, ‘या’ टूर्नामेंटपासून होणार सुरुवात 

लुईसची मैदानावर चौफेर फटकेबाजी, एकाच षटकात ठोकले तब्बल ५ षटकार

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---