इंग्लंडचा भारत दौरा शेवटच्या टप्प्यात आला आहे. कसोटी, टी२० मालिका पूर्ण केल्यानंतर भारत विरुद्ध इंग्लंड दरम्यान वनडे मालिकेचा थरार रंगला आहे. या मालिकेतील तिसरा आणि निर्णायक वनडे सामना गहुंजे स्टेडियम, पुणे येथे चालू आहे. या सामन्यात भारताचा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत याने इंग्लंडला धू धू धुतले. दरम्यान त्याचा एक विचित्र शॉट पाहून सर्वांचे होश उडाले.
त्याचे झाले असे की, इंग्लंडचा फिरकीपटू आदिल रशिदने भारताची सलामी जोडी तंबूत धाडली. त्यानंतर कर्णधार विराट कोहलीही अष्टपैलू मोईन अलीच्या चेंडूवर त्रिफळाचीत झाला. त्यामुळे भारतीय संघ दबावात आला होता. परंतु या गोष्टींचा पंतवर कसलाही परिणाम झाला नाही. रोहित शर्मा, शिखर धवनला बाद करणाऱ्या रशिदला त्याने चोप चोपले.
रशिद डावातील २१ वे षटक टाकण्यासाठी आला होता. त्याच्या षटकातील पहिल्या पाच चेंडूंवर पंत आणि केएल राहुलला जास्त धावा घेता आल्या नाहीत. अशात त्याच्या षटकातील शेवटच्या चेंडूवर पंतने एका गुडघ्यावर बसत आणि दुसरा पायाचा आधार घेत अनोखा रिव्हर्स शॉट मारला. त्याचा चेंडू हवेतून सरळ सीमारेषेबाहेर जाऊल पडला आणि भारतीय संघाला ६ धावा मिळाल्या.
यानंतरही पंतने पुढे डाव्या बाजूला शानदार चौकार मारला. पंतच्या या आगळ्यावेगळ्या फटकेबाजीने सामना दर्शकांची मने जिंकली आहेत. अनेकांनी त्याचे जबरदस्त फटके मारतानाचे व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत त्याला ‘मिस्टर ३६०’ असे म्हटले आहे.
https://twitter.com/MallaVinayak/status/1376108522971176964?s=20
https://twitter.com/MallaVinayak/status/1376108579346771968?s=20
https://twitter.com/VK2021_/status/1376108519158521859?s=20
पंतने षटकार- चौकारांचा पाऊस पाडत चुरसीच्या तिसऱ्या वनडे सामन्यात ४४ चेंडूत अर्धशतकाला गवसणी घातली आहे. हे त्याचे वनडेतील ४७ वे अर्धशतक ठरले आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
‘त्या’ महान अष्टपैलू क्रिकेटपटूने बरोबर ५७ वर्षापुर्वी घेतल्या होत्या ५ चेंडूत ५ विकेट्स…
अन् कसोटी क्रिकेटमधील सर्वात निचांकी धावांचा विक्रम न्यूझीलंडच्या नावावर झाला…
विराट कोहली परत एकदा टॉस हरल्यावर कर्णधार जोश बटलरच्या चेहऱ्यावरील हसू होतं पाहण्यासारखं