भारतीय संघ सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर चार सामन्यांची कसोटी मालिका खेळत आहे. या मालिकेतील सिडनी कसोटीतील तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा ऑस्ट्रेलियाकडे १९७ धावांची आघाडी असून त्यांचे ८ बळी बाकी आहेत. त्यामुळे भारताला चौथ्या डावात मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करावा लागणार हे स्पष्ट आहे. अशा परिस्थितीत सामना ऑस्ट्रेलियाच्या पारड्यात झुकला आहे.
तिसऱ्या दिवशी भारताचा यष्टीरक्षक रिषभ पंत फलंदाजी करत असतांना ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स गोलंदाजी करत होता. त्यावेळी कमिन्सने टाकलेला आखूड टप्प्याचा चेंडू पंतच्या कोपरावर लागला. कमिन्सने १४१ ताशी किलोमीटर वेगाने टाकलेला चेंडू लागताच पंत वेदनेने कळवळला. त्यावेळी लगचेच काहीवेळासाठी भारताचा मेडिकल स्टाफ मैदानावर आला होता. पण पंतने उपचार घेतल्यानंतर खेळणे कायम ठेवले. परंतु, तो काहीवेळातच ३६ धावांवर बाद झाला. त्यानंतर त्याला स्कॅनसाठी हॉस्पिटलात घेऊन जाण्यात आले.
या घटनेने एक अजब योगायोग घडल्याचे लक्षात आले. ट्विटरवर एका चाहत्याने ट्विट करत हा योगायोग सगळ्यांच्या लक्षात आणून दिला. यात म्हंटले आहे की २०१९ साली कमिन्सच्या चेंडूने शिखर धवनला दुखापत झाली आणि तो विश्वचषक स्पर्धेतून बाहेर झाला. २०२० साली म्हणजे मागच्या डिसेंबर महिन्यात अॅडलेडच्या कसोटी सामन्यात कमिन्सच्याच चेंडूवर मोहम्मद शमीच्या मनगटाला चेंडू लागून दुखापत झाली आणि शमी मालिकेच्या बाहेर गेला. आणि आता नववर्षात म्हणजे २०२१ मध्ये कमिन्सच्या चेंडूने पंतला दुखापत झाली आहे. त्यामुळे जणूकाही दरवर्षी कमिन्सच्या चेंडूने भारतीय फलंदाजांना दुखापत होणे जणूकाही नित्याचेच झाले आहे.
Every year Pat Cummins injures an Indian player
2019 WC – Dhawan ruled out because of fracture after a bouncer from Cummins
2020 – Shami ruled out of BGT after a bouncer from Cummins
2021 – Pant injured after a short ball from Cummins 😷😷
— Pratik (@Prat1k_) January 9, 2021
मात्र, यापूर्वीच्या म्हणजे २०१९ आणि २०२० सालच्या घटनांमध्ये धवन आणि शमीला उर्वरित सामन्यांना मुकावे लागले होते. पण आता पंतच्या बाबतीत या योगायोगाची पुनरावृत्ती होऊ नये, अशीच भारतीय संघाची इच्छा असेल.
महत्वाच्या बातम्या:
मोठी बातमी.! टीम इंडियाला आणखीन एक धक्का, रविंद्र जडेजा कसोटी मालिकेतून आऊट
इरफान पठाणचे पदार्पण; पण क्रिकेटच्या नव्हे तर सिनेसृष्टीच्या पिचवर, पाहा फिल्मचा टीझर
सबस्टिट्युट विकेटकिपर म्हणजे काय रे भाऊ? नियमाचा भारतच होता पहिला लाभार्थी; जाणून घ्या