ऑस्ट्रेलियाचे दिग्गज क्रिकेटपटू शेन वॉर्न यांची क्रिकेट कारकिर्द विवादांनी भरलेली होती. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतरही त्यांच्या या वाईट सवयीत बदल झाले नाहीत. ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात ब्रिस्बेनच्या द गॅबा स्टेडियमवर चौथा आणि शेवटचा कसोटी सामना चालू आहे. या सामन्याचे समालोचन करताना वॉर्न यांनी सहकारी केरी ओकिफी यांच्यासोबत मिळून रिषभ पंतची थट्टा केली. त्यानंतर भारतीय क्रिकेट रसिकांनी त्यांना सोशल मीडियावर ट्रोल करायला सुरुवात केली आहे.
झाले असे की, सामन्याच्या दुसऱ्या दिवशी (१६ जानेवारी) भारताचा यष्टीरक्षक पंत याने अजब सनग्लासेस घातले होते. त्याच्या सनग्लासेसचा रंग पोपटी आणि लाल असा होता. सोबतच त्यांची डिझाईन लहान मुलांच्या सनग्लासेसप्रमाणे असल्याचे दिसत होते.
हे पाहून सामन्याचे समालोचन करत असलेल्या वॉर्न यांनी ऑकिफी यांना विचारले की, “पंतच्या सनग्लासेसवरील रंगांचे शेड्स पाहून तुला काय वाटतं?. मला तर तो सरळ सर्व्हिस स्टेशनमधून इथे आल्यासारखे वाटत आहे.” “मला तर त्याच्या सनग्लासेसला ओरखडावे असे वाटत आहे. जेणेकरून आपण त्यांना कचरापेटीत तरी टाकू शकतो”, असे वॉर्नच्या प्रश्नावर प्रत्युत्तर देत ओकिफी म्हणाले.
वॉर्न आणि ओफिकी यांच्यातील या संवादावर भारतीय क्रिकेट रसिकांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. एका रसिकाने वॉर्न यांचे क्रिकेट सामन्यादरम्यान वेगवेगळ्या प्रकारचे सनग्लासेस घातल्याचे फोटो शेअर केले आहेत. याला कॅप्शन देत त्याने लिहिले आहे की, ‘मला नाही वाटतं की, हे पाहिल्यानंतर वॉर्न दुसऱ्यावर कमेंट करु शकतात.’
तसेच काही क्रिकेट रसिकांनी विनोदी प्रतिक्रिया दिल्या आहेत. ‘बंदर क्या जाने अद्रक का स्वाद’, असे एका वापरकर्त्याने लिहिले आहे. तर ‘ते पंतचे सनग्लासेस नाहीत, ते त्याचे फनग्लासेस आहेत’, अशी प्रतिक्रिया एकाने दिली आहे.
"You would want them to get scratched so you could put them in the bin!"
Shane Warne and Kerry O'Keefe aren't having Rishabh Pant's sunglasses 😂😂😂#AUSvIND pic.twitter.com/NP88lZ6Roh
— Cricket on TNT Sports (@cricketontnt) January 16, 2021
— Biji pandey (@PeterParker7194) January 16, 2021
Bandar Kya Jaane Adrak Ka Swad..!! 😂 #IndVsAus
— Dipen Verma (@dipenverma) January 16, 2021
They are not sun glasses..they are fun-glasses for Pant!
— I have spoken! (@Darthva23645285) January 16, 2021
https://twitter.com/nakshatrala/status/1350554424523988992?s=20
Rude to make fun of someone, I was surprised that Kerry joined in the attack with the brash Warne, thought Kerry had a bit more sense
— JW (@continueqw) January 16, 2021
Weld their mouths….doesn't talk about game anyway🤣😂
— Sarb (@ChandlerStinso1) January 16, 2021
भारत १९० धावांनी मागे
ब्रिस्बेन कसोटी सामन्याविषयी बोलायचे झाले तर, ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना भारतापुढे ३७० धावांचे आव्हान ठेवले आहे. यात विस्फोटक फलंदाज मार्नस लॅब्यूशाने याच्या शतकी खेळीचा समावेश आहे. प्रत्युत्तरादाखल ६५ षटकापर्यंत १७९ धावा करत भारताचा अर्धा संघ बाद झाला आहे. त्यामुळे भारतीय संघ अजून १९० धावांनी पिछाडीवर आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
IND vs AUS Test Live : भारताचा अर्धा संघ तंबुत; भारताच्या ६५ षटकात ५ बाद १७५ धावा
अबब! भारताने एकाच मालिकेत खेळवले तब्बल ‘इतके’ खेळाडू