भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाच्या कसोटी मालिकेतील तिसऱ्या सामन्याला ७ जानेवारीपासून सिडनीच्या मैदानावर सुरुवात झाली. या सामन्यात दुसऱ्या दिवशी भारताचा युवा सलामीवीर शुबमन गिलने अर्धशतक झळकावले. २१ वर्षीय गिलचा हा फक्त दुसरा कसोटी सामना आहे. मात्र या सामन्यात त्याने दाखवलेली परिपक्वता आणि फलंदाजीतील कौशल्य पाहून अनेकांनी त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.
आजी-माजी खेळाडूंनी केली स्तुती
शुबमन गिलच्या खेळीने माजी खेळाडू प्रभावित झाल्याचे दिसले. भारताचा माजी शैलीदार फलंदाज व्हीव्हीएस लक्ष्मणने ट्विट करत शुबमनच्या खेळाचे कौतुक केले. त्याने लिहिले, “शुबमन आपल्या कारकिर्दीतील अवघी दुसरी कसोटी खेळत होता, मात्र खेळपट्टीवर तो आत्मविश्वासाने परिपूर्ण असल्याचे दिसले. त्याच्याकडे भक्कम बचाव, चांगले सकारात्मक फटके आणि विचारांची स्पष्टता आहे. तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये भारताकडून त्याचे भविष्य उज्ज्वल आहे.”
For someone playing only his 2nd test match @RealShubmanGill looks very assured at the wicket. Good solid defence, positive stroke play and clarity of thought. Definitely has a very bright future for India in all the 3 formats. #AUSvsIND
— VVS Laxman (@VVSLaxman281) January 8, 2021
लक्ष्मणसह भारताचा यष्टीरक्षक-फलंदाज दिनेश कार्तिकने देखील ट्विटरवरून शुबमनचे अभिनंदन केले. “नक्कीच एक स्टार खेळाडू उदयास येत आहे. उत्तम सुरुवात शुबमन. तू संपूर्ण काळ आत्मविश्वासपूर्ण वाटत होतास. ज्या पद्धतीने आउट झालास त्याबद्दल स्वतःला फार दोष देऊ नकोस”, अशा शब्दात कार्तिकने ट्विट केले.
A ⭐️ has arrived. Good start Gilly! You looked good the whole time. Don’t be too hard on yourself about the dismissal.#AUSvIND pic.twitter.com/WHVyN3J0QY
— DK (@DineshKarthik) January 8, 2021
जडेजानेही थोपटली पाठ
सिडनी कसोटीच्या दुसऱ्या दिवशीच्या खेळानंतर आभासी पत्रकार परिषदेत बोलताना रवींद्र जडेजाने देखील शुबमनची पाठ थोपटली. तो म्हणाला, “माझ्या मते शुबमन तांत्रिक दृष्ट्या अचूक आहे. मोठी खेळी साकारण्याचा त्याच स्वभाव आहे. आज त्याला चांगली सुरुवात मिळाली, हे उत्तम झाले. रोहितसह त्याने संघाला ७० धावांची सलामी दिली. भारतासाठी हे अतिशय चांगले संकेत आहेत. तो दुसऱ्या डावातही अशीच चांगली फलंदाजी करेल, अशी आम्हाला आशा आहे.”
महत्वाच्या बातम्या:
पुजाराची संथ फलंदाजी आणि प्रेक्षकाने भर मैदानातच घेतली डुलकी!
ऑलिंपिकमध्ये व्हावा टी-१० क्रिकेटचा समावेश, स्फोटक फलंदाज ख्रिस गेलची मागणी
आयडियाची कल्पना! लॅब्यूशानेने बॅटची ग्रीप बसवताना हँडेलवर फुंकर घातल्याचं हे होतं कारण