गेल्या दीडवर्षापासून जगातील जवळपास सर्व देश कोरोना व्हायरसच्या महामारीच्या संकटाचा सामना करत आहे. अनेक सेलिब्रटींनाही आत्तापर्यंत कोरोनाची लागण होऊन गेली आहे. यात आता भारताचा माजी क्रिकेटपटू युसूफ पठाण देखील अडकला आहे. त्याचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. याबद्दल त्याने सोशल मीडियावर पोस्ट करत माहिती दिली आहे.
त्याने ट्विट केले आहे की ‘माझा आज (२६ मार्च) कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. मला सौम्य लक्षणे होती. अहवाल आल्यानंतर मी माझ्या घरातच क्वारंटाईन झालो आहे. तसेच आवश्यक त्या सर्व खबरदारी आणि औषधे मी घेत आहे. माझ्याशी संपर्क साधलेल्या सर्वांनी लवकरात लवकर त्यांची कोरोना चाचणी करुन घ्यावी अशी मी विनंती करतो.’]
I've tested positive for COVID-19 today with mild symptoms. Post the confirmation, I have quarantined myself at home and taking all the necessary precautions and medication required.
I would request those who came in contact with me to get themselves tested at the earliest.
— Yusuf Pathan (@iamyusufpathan) March 27, 2021
सचिन तेंडुलकरही कोरोना पॉझिटिव्ह
युसूफच्या आधी आज सकाळीच मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरनेही त्याचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती दिली होती. विशेष म्हणजे सचिन आणि युसूफ काही दिवसांपूर्वी रायपूर येथे रोड सेफ्टी वर्ल्ड सिरिज २०२१ स्पर्धेत एकत्र खेळले होते.
— Sachin Tendulkar (@sachin_rt) March 27, 2021
युुसुफची आंतरराष्ट्रीय कारकिर्द –
युसुफ २००७ टी२० विश्वचषक आणि २०११ सालच्या वनडे विश्वचषक विजेत्या भारतीय संघाचा भाग राहिला आहे. विशेष म्हणजे त्याने २००७ च्या टी२० विश्वचषकातील अंतिम सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते.
युसुफने त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत ५७ वनडे सामने खेळले असुन यात २ शतके आणि ३ अर्धशतकांसह ८१० धावा केल्या आहेत. त्याचबरोबर त्याने ४१.३६ च्या सरासरीने ३३ विकेट्सही घेतल्या. तसेत त्याने २२ आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळताना २३६ धावा केल्या असून १३ विकेट्स घेतल्या आहेत.
त्याचबरोबर आयपीएलमध्ये युसूफने १७४ सामन्यात ३२०४ धावा व ४२ विकेट्स घेतल्या आहे. २०२१मध्ये मार्च महिन्यात त्याने निवृत्तीची घोषणा केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
डिव्हिलियर्स आरसीबीसाठी यष्टीरक्षण करणार का? माईक हेसन यांनी दिले ‘हे’ उत्तर
सचिनबरोबर ‘ज्या’ गोष्टीसाठी होते कर्णधार कोहलीची तुलना, ‘त्या’ गोष्टीला विराट देतोय शुन्य महत्त्व