---Advertisement---

प्रशिक्षक म्हणून उत्कृष्ट कोण? गंभीर की द्रविड? भारताच्या स्टार खेळाडूचा मोठा खुलासा

---Advertisement---

भारतीय संघाने बांगलादेशविरूद्धच्या 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला कसोटी सामना जिंकला आणि 1-0 अशी आघाडी घेतली. तत्पूर्वी भारतीय क्रिकेट संघाचा स्टार अनुभवी फिरकीपटू रविचंद्रन अश्विनने (Ravichandran Ashwin) टी20 विश्वचषक (T20 World Cup) विजेता माजी मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड (Rahul Dravid) आणि सध्याचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर (Gautam Gambhir) यांच्या प्रशिक्षणातील फरकाबद्दल मोठा खुलासा केला आहे.

राहुल द्रविड (Rahul Dravid) नोव्हेंबर 2021 पासून भारतीय संघाचे प्रशिक्षक होते. जुलैमध्ये ते भारतीय संघापासून वेगळे झाले. त्यांच्या उपस्थितीत संघाने टी20 विश्वचषकाचे विजेतेपद पटकावले. गंभीर आणि राहुल द्रविड यांच्यातील फरक सांगताना अश्विन म्हणाला की, “गंभीर खूप शांत आहे आणि त्याची वृत्ती ड्रेसिंग रूममध्ये चैतन्यशील वातावरण राखण्यास मदत करते. त्याच्या उपस्थितीत कोणताही दबाव सहजपणे हाताळला जाऊ शकतो.”

द्रविडबद्दल बोलताना अश्विन म्हणाला, “सकाळी संघाच्या बैठकीबाबतही तो खूप आरामदायक होता. तो तुम्हाला विचारतो की तुम्ही सकाळी मीटिंगला येणार का, कृपया या. द्रविडचा दृष्टिकोन गंभीरपेक्षा कठोर आणि पद्धतशीर होता. राहुल भाई गोष्टी अतिशय व्यवस्थित ठेवू इच्छित होते. या बाबतीत ते अतिशय शिस्तप्रिय होते.”

पुढे बोलताना अश्विन म्हणाला, “मला गंभीरकडून अशा गोष्टींची अपेक्षा नाही. त्याला फार कडक राहायला आवडत नाही. तो सर्वांची काळजी घेतो आणि मला वाटते की संघातील सर्व खेळाडूंना तो आवडेल.”

पंतबद्दल बोलताना अश्विन म्हणाला, “तो खूप चांगला खेळला. मी रोहितला 10 वेळा सांगितले की तो खूप चांगला खेळतो, पण तो कसा आऊट होतो हे मला माहीत नाही. तो प्रत्येक प्रकारे क्रिकेटसाठी जन्माला आला आहे आणि एक मजबूत व्यक्ती आहे. जेव्हा तो चेंडू मारतो तेव्हा चेंडू लांब अंतरावर जातो. त्याच्याकडे एका हाताने मोठे फटके खेळण्याची क्षमता आहे.”

महत्त्वाच्या बातम्या-

अर्जुनच्या वाढदिवसानिमित्त वडील सचिन तेंडुलकरची मन जिंकणारी पोस्ट; म्हणाला, “माझ्या गुणी…”
‘मन’ खूप झालं आता ‘जग’ जिंकायचंय! टी20 विश्वचषकापूर्वी कर्णधार हरमनप्रीतची ऑस्ट्रेलियाला चेतावणी
भारत वि. बांगलादेश संघातील दुसऱ्या कसोटीपूर्वी मोठा गोंधळ, कानपूर स्टेडियमच्या सुरक्षेत वाढ

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---