पुणे | अल्टीमेट टेबल टेनिस लीग मधील महाराष्ट्र यिनायटेड संघाची जागतीक क्रमवारीत 19 व्या स्थानावर असलेली एलीझाबेता समारा म्हणाली की, मी भारतीय खेळाडूंना आंतरराष्ट्रीय सामने खेळताना पाहिले आहे. त्यांचा खेळ स्पर्धात्माक आहे तसेच खेळ समजुन त्यामध्ये विकास करताना ते दिसतात.
जागतीक क्रमवारीत 19व्या स्थानावर असलेल्या रोमानीयन समाराने 11व्या स्थानावरील आरपीएसजी मावेरिंक्स् संघाच्या हॅंगकॅंगच्या डु होई केम हीचा 3-0 असा पराभव केला. यावेळी समारा म्हणाली, हे लीग खेळाडूंचा व्यावसायीक खेळ उंचावण्यासाठी एक उत्तम संधी आहे. लीगची रचना व नियम उत्तम आहे. मला विश्वास आहे लीगमधील सर्वच खेळाडू लीगचा आनंद लुटत असतील.
ट्राफ्ट दरम्यान समारा ही महाराष्ट्र युनायटेड संघाकडून दुस-या फेरीत सामील करून घेतलेली पहिली परदेशी महिला खेळाडू आहे.
समारा ही तीन वेळा युरोपीयन चॅम्पियन आहे. 29 वर्षीय समाराने 2008, 2012 व 2016 अशा तीन ऑलंपीक स्पर्धांमध्ये रोमानीयाचे प्रतिनिधित्व केले आहे. आपल्या भावाला खेळताना बघुन समाराने टेबल टेनिस खेळण्यास सुरूवात केली.
समारा पुढे म्हणाली, या लीग बाबतचा अनुभव विलक्षण आहे. आत्तापर्यंत माझ्या संघातील इतर खेळाडूंनी दाखवलेल्या उत्साहामुळे मी प्रभावीत झाले आहे. प्रत्येक खेळात सुधारण्याची संधी नेहमीच असते त्यामुळे मला वाटते की भारत योग्य मार्गावर आहे.