आयपीएल 2020 चा 13 वा हंगाम येत्या 29 मार्चपासून सुरू होणार आहे. आयपीएलचा पहिला सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर होईल. अंतिम सामना 24 मे रोजी खेळला जाईल, परंतु हा अंतिम सामना कोठे होणार याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही.
या वेळी ही स्पर्धा 57 दिवस चालणार असल्याची पुष्टी आयएएनएसच्या सुत्राने दिली आहे. बीसीसीआयने दिवसात एक सामना ठेवण्याची योजना आखली आहे. रात्रीचे सामने 8 ऐवजी सायंकाळी 7:30 वाजता सुरू होतील. 2019 मध्ये ही स्पर्धा 51 दिवस चालली.
अशा परिस्थितीत, एका दिवसात एक सामना खेळण्यात कोणतीही अडचण येणार नाही.
सुत्राने दिलेल्या माहितीनुसार लीगच्या प्रसारणकर्ताचे म्हणणे आहे की, सामने लवकर सुरू व्हावेत.
ते म्हणाले, “टीआरपी ही एक मोठी समस्या आहे, परंतु फक्त या सर्व गोष्टी त्यावर अंवलबून ठेवू नका, गेल्या मोसमातील सामने उशीरा संपले हे देखील लक्षात घ्यावे लागेल. सामना पाहण्यासाठी आलेल्या प्रेक्षकांना घरी परत जाण्यासाठी अधिक वेळ नव्हता. यावर चर्चा झाली आहे आणि या मोसमात सायंकाळी साडेसात वाजता सामना सुरू होईल हे जवळपास निश्चित आहे.”
तब्बल 22 महिन्यांनी संघात स्थान दिलेला शार्दूल ठाकूर म्हणतो…
वाचा- 👉https://t.co/O11KDurLTb👈#म #मराठी #Cricket @imShard— Maha Sports (@Maha_Sports) January 8, 2020
श्रेयस अय्यरच्या 'त्या' षटकारावर अशी होती कॅप्टन कोहलीची रिऍक्शन
वाचा👉https://t.co/DJlYwHrF66👈#म #मराठी #Cricket #INDvSL #TeamIndia @imVkohli @ShreyasIyer15— Maha Sports (@Maha_Sports) January 8, 2020