भारतीय महिला क्रिकेट संघाने अंडर-19 विश्वचषक (Under 19 World Cup) जिंकला आहे. निकी प्रसादच्या (Niki Prasad) नेतृत्वाखालील भारतीय संघाने फायनल सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा धुव्वा उडवला. अशाप्रकारे, निकी प्रसादने विराट कोहली (Virat Kohli), मोहम्मद कैफ (Mohammad Kaif), शफाली वर्मा (Shafali Verma) आणि पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) सारख्या स्टार कर्णधारांच्या यादीत आपले नाव नोंदवले आहे.
खरेतर या नावांनी भारतासाठी अंडर-19 विश्वचषक जिंकला आहे. तथापि, आज (2 फेब्रुवारी) आपण त्या भारतीय कर्णधारांबद्दल जाणून घेऊया, ज्यांनी भारतासाठी अंडर-19 विश्वचषक जिंकला आहे.
या यादीत पहिले नाव मोहम्मद कैफचे (Mohammad Kaif) आहे. कैफच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने 2000 मध्ये अंडर-19 विश्वचषक जिंकला. भारतीय संघाने फायनल सामन्यात श्रीलंकेचा पराभव केला. यानंतर, 2008च्या अंडर-19 विश्वचषकात विराट कोहलीच्या (Virat Kohli) वेतृत्वाखाली भारतीय संघ दुसऱ्यांदा विजेता बनला. दरम्यान भारताने फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेचा धुव्वा उडवला होता. या यादीतील तिसरे नाव उन्मुक्त चंद (Unmukt Chand) आहे. उन्मुक्त चंदच्या नेतृत्वाखाली भारताने 2012 मध्ये अंडर-19 विश्वचषक जिंकला.
पृथ्वी शॉच्या (Prithvi Shaw) नेतृत्वाखाली भारतीय संघाने 2018चा अंडर-19 विश्वचषक जिंकला. या यादीतील पाचवे नाव यश धुलचे (Yash Dhull) आहे. यश धुलच्या नेतृत्वाखाली भारताने 2022चा अंडर-19 विश्वचषक जिंकला होता. दरम्यान भारताने इंग्लंडचा 4 विकेट्सने धुव्वा उडवला होता.
यानंतर, भारतीय महिला संघाने शफाली वर्माच्या (Shafali Verma) नेतृत्वाखाली 2023चा अंडर-19 विश्वचषक जिंकला. दरम्यान भारतीय महिला संघाने फायनल सामन्यात इंग्लंडला धूळ चारली होती. आता, निकी प्रसादच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ चॅम्पियन बनला आहे. भारताने फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेला धूळ चारली.
A familiar scene for India in Malaysia 😉#U19WorldCup pic.twitter.com/tjNOJwaJ6K
— ICC (@ICC) February 2, 2025
महत्त्वाच्या बातम्या-
IND vs ENG; इंग्लंडने जिंकला टाॅस; गोलंदाजीचा निर्णय! जाणून घ्या दोन्ही संघांच्या प्लेइंग 11
राष्ट्रीय विक्रमासह वैष्णव ठाकूरची रूपेरी कामगिरी
स्क्वॅशमध्ये डबल धमाका, महिलांना सुवर्ण, पुरूष संघाला रौप्य