पुणे। महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस असोसिएशन (एमएसएलटीए) च्या वतीने व महाराष्ट्र सरकारच्या सहकार्याने आयोजित आयोजित तिसऱ्या टाटा ओपन महाराष्ट्र टेनिस स्पर्धेत एकेरी गटत दक्षिण कोरियाच्या चौथ्या मानांकीत क्वान सून-वू याने भारताच्या प्रजनेश गुन्नेस्वरनचा पराभव करत उपांत्यपर्व फेरीत प्रवेश केला. ऑस्ट्रेलियाच्या सहाव्या मानांकीत जेम्स डकवर्थने जपानच्या तारो डॅनियल याचा पराभव करत उपांत्यपुर्व फेरीत प्रवेश केला.
म्हाळुंगे बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलातील टेनिस कोर्टवर सुरु असलेल्या या स्पर्धेत एकेरीच्या दुस-या फेरीत दक्षिण कोरियाच्या 22 वर्षीय व जागतिक क्रमांक 88 असलेल्या चौथ्या मानांकीत क्वान सून-वू याने भारताच्या राष्ट्रीय क्रमांक एक 30 वर्षीय प्रजनेश गुन्नेस्वरनचा 6-3, 7-6(5) असा पराभव करत उपांत्यपर्व फेरीत प्रवेश केला.
1 तास 44 मिनिट चाललेल्या सामन्यात पहिल्या सेटमध्ये पहिल्या गेममध्ये प्रजनेशने क्वानची सर्व्हिस भेदत सामन्यात यशस्वी सुरूवात केली. मात्र पुढच्या दुस-या गेममध्ये क्वानने प्रजनेशची सर्व्हिस ब्रेक करत सामना 1-1 असा बरोबरीत आणला. चौथ्या गेमअंती सामना 2-2 असा बरोबरीत असताना सहाव्या गेममध्ये क्वानने प्रजनेशची सर्व्हिस भदली व सातव्या गेममध्ये स्वतःची सर्व्हिस राखत ५-२ अशी भक्कम आघाडी घेतली.
नवव्या गेममध्ये स्वतःची सर्व्हिस राखत पहिला सेट 6-3 असा जिंकला. दुस-या गेममध्ये सामना बाराव्या गेमपर्यंत ६-६ असा बपोबरीत राहिल्याने टायब्रेक झाला. टायब्रेकमध्ये क्वान सून-वू याने आक्रमक खेळाचे प्रदर्शन करत 7-6(5) असा टयब्रेक जिंकत सामन्यात 6-3, 7-6(5) अशा विजयीसह उपांत्यपुर्व फेरीत प्रवेश केला.
तब्बल 2 तास 53 मिनिट चाललेल्या संघर्षपुर्ण लढतीतऑस्ट्रेलियाच्या सहाव्या मानांकीत जेम्स डकवर्थने जपानच्या तारो डॅनियल याचा 6-7(4), 7-6(6),6-3 असा पराभव करत उपांत्यपुर्व फेरीत प्रवेश केला. पहिल्या सेटमध्ये 27 वर्षीय जागतिक क्रमांक 102 असलेल्या तारो डॅनियलने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत 6-7(4) असा जिंकला. पहिल्या सेटमध्ये चौथ्या गेमअंती सामना 2-2 अशा बरोबरीत असताना पाचव्या गेममध्ये तारोने जेम्सची सर्व्हिस भेदत 3-2 अशी आघाडी घेतली.
दहाव्या गेममध्ये जेम्सने तारोची सर्व्हिस भेदत सामना 5-5 असा बरोबरीत आला व सामना बाराव्या गेमपर्यंत 6-6असा बरोबरीत राहिल्याने टायब्रेक झाला. टायब्रेकमध्ये तारोने आक्रमक खेळाचे प्रदर्शन करत 6-7(4) असा टायब्रेकसह सेट जिंकत सामन्यात आघाडी घेतली. दुसरा सेटही संघ्रषपुर्ण झाला दोन्ही खेळाडूंनी सामन्यातील आपली पकड घट्ट ठेवत दुसरा सेट बाराव्या गेमपर्यंत 6-6 असा बरोबरीत राहिल्याने टायब्रेक झाला. यावेळी 28 वर्षीय जागतिक क्रमांक 96 असलेल्या जेम्सने आपले खेळातील सर्व कौशल्य पणाला लावत टायब्रेक 7-6(6) असा जिंकत दुसरा सेट जिंकला व सामन्यात 1-1 अशी बरोबरी साधली.
तिसरा सेटमात्र जेम्स डकवर्थने सय्यमाने खेळला. तिसरा सेट तिस-या गेमअंती 3-3 असा बरोबरीत होता. आठव्या गेममध्ये जेम्सने तारोची सर्व्हिस भेदत 5-3 अशी आघाडी घेतली. नवव्या गेममध्ये स्वतःची सर्व्हिस राखत तिसरा सेट 6-3 असा जिंकून सामन्यात 6-7(4), 7-6(6),6-3 असा विजय मिळवत उपांत्यपुर्व फेरीत प्रवेश केला.
दुहेरी गटात उपांत्यपुर्व फेरीत मोनाकोच्या रोमेन अर्नेओडो याने जर्मनीच्या आंद्रे बेगेमन याच्या साथीत अव्वल मानांकीत जोडी स्वीडनचा रॉबर्ट लिंडस्टेड व नेदरलँड्सचा रॉबिन हास यांना एकतर्फी सामन्यात 6-3, 6-3 असा पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला. तिसरी मानांकीत जोडी इस्त्राईलच्या जोनाथन एर्लिचने बेलारूसच्या आंद्रे वासिलेव्हस्की याच्या साथीत इटलीच्या पाओलो लोरेन्झी व स्टेफानो ट्रॅव्हेगलिया यांचा 5-7, 6-1, 10-8 असा तीन सेटमध्ये पराभव करत उपांत्य फेरी गाठली.
स्पर्धेचा सविस्तर निकाल- एकेरी गट- दुसरी फेरी।
जेम्स डकवर्थ (ऑस्ट्रेलिया)(6) वि.वि तारो डॅनियल (जपान)6-7(4), 7-6(6),6-3
क्वान सून-वू(दक्षिण कोरिया)(4) वि.वि प्रजनेश गुन्नेस्वरन(भारत) 6-3, 7-6(5)
दुहेरी गट- उपांत्यपुर्व फेरी।
रोमेन अर्नेओडो (मोनाको) / आंद्रे बेगेमन (जर्मनी) वि.वि रॉबर्ट लिंडस्टेड (स्वीडन) / रॉबिन हास (नेदरलँड्स) (1) 6-3, 6-3
जोनाथन एर्लिच (इस्त्राईल) / आंद्रे वासिलेव्हस्की (बेलारूस) (3) वि.वि पाओलो लोरेन्झी (इटली)/स्टेफानो ट्रॅव्हेगलिया (इटली) 5-7, 6-1, 10-8