गोल्ड कोस्ट | वेटलिफ्टर दीपक लाठेरने कांस्यपदक जिंकत भारताला वेटलिफ्टिंगमध्ये तिसरे तर एकूण चौथे पदक मिळवून दिले. त्याने ६९ किलो वजनी गटात ही कामगिरी केली आहे.
१८ वर्षीय दीपक लाठेरचे सुवर्ण पदक केवळ ४ किलोने हुकल्यामुळे हा खेळाडू पारितोषिक वितरण समारंभावेळी चांगलाच नाराज होता.
स्नच प्रकारात त्याने पहिल्या प्रयत्नात १३२, दुसऱ्या प्रयत्नात १३६ किलो वजन उचलले तर तिसऱ्या प्रयत्नात १३८ किलो वजन उचलण्यात तो अपयशी ठरला.
क्लिन आणि जर्क प्रकारात तिने पहिल्या प्रयत्नात १५५, दुसऱ्या प्रयत्नात १६२ तर वजन उचलले तर तिसऱ्या प्रयत्नात १६२ किलो वजन उचलण्यात तो अपयशी ठरला.
यामुळे त्याने एकूण २९५ किलो वजन उचलल्यामुळे त्याला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. वेल्सच्या गेरथ ईवान्सने २९९ किलो वजन उचलत सुवर्ण तर श्रीलंकेच्या दुमीयासेलंगेने २९७ किलो वजन उचलत रौप्यपदक जिंकले.
भारत सध्या पदकतालिकेत तिसऱ्या स्थानी असून भारताने यात दोन सुवर्ण, एक रौप्य आणि एक कांस्यपदक जिंकले आहेत. इंग्लड १२ पदकासह (६ सुवर्ण)अव्वल तर आॅस्ट्रेलिया १५ पदकासह (५ सुवर्ण) दुसऱ्या स्थानावर आहे.