उद्या रणजीपटू वसंत रायजी हे वयाची शंभरी साजरी करणार आहेत. त्यांचा जम्न 26 जानेवारी 1920 मध्ये बडोदा येथे झाला होता. ते रणजी ट्रॉफीमध्ये खेळलेले भारताचे सध्या हयात सर्वात वयस्कर क्रिकेटपटू आहेत.
उजव्या हाताने फलंदाजी करणारे वसंत रायजी हे त्यांच्या क्रिकेट कारकिर्दीत 1940 ते 1950 सालाच्या दरम्यान 9 प्रथम श्रेणी क्रिकेट सामने खेळले आहेत. यात त्यांनी 277 धावा केल्या. यातील 68 धावा ही त्यांची सर्वोत्तम खेळी आहे.
त्यांनी मुंबई आणि बडोदाकडून क्रिकेट खेळले आहेत. तसेच इंग्लंडला शिक्षणासाठी गेले असताना त्यांनी तिथे क्लब क्रिकेट देखील खेळले आहे.
भारताने जेव्हा पहिला कसोटी सामना खेळला त्यावेळी वसंत रायजी 13 वर्षांचे होते. नुकतीच काही दिवसांपूर्वी त्यांची मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर आणि ऑस्ट्रेलियाचे माजी कर्णधार स्टिव्ह वॉ यांनी दक्षिण मुंबईमध्ये असलेल्या वाळकेश्वर येथील त्यांच्या रहात्या घरी भेट घेतली होती.
रायजींनी व्यावसायिक क्रिकेट खेळणे थांबविल्यानंतर, इतिहासकार म्हणून त्यांनी या खेळाशी आपला संबंध कायम ठेवला. त्यांनी 12 हून अधिक क्रिकेटवर पुस्तके लिहिली आहेत, ज्यात नायडू यांच्या आत्मचरित्राचाही समावेश आहे.
वाढदिवस विशेष: टीम इंडियाची माॅडर्न एराची भिंत, चेतेश्वर पुजारा!
वाचा👉https://t.co/Whv74rl1Uw👈#म #मराठी #Cricket #TeamIndia @cheteshwar1— Maha Sports (@Maha_Sports) January 25, 2020
ते एक वाक्य क्रिकेटरला पडले तब्बल १लाख ४० हजारांना
वाचा👉https://t.co/abey7FkbXc👈#म #मराठी #Cricket— Maha Sports (@Maha_Sports) January 24, 2020