ऑस्ट्रेलियात चालू असलेल्या गोल कोस्ट राष्ट्रकुल स्पर्धेत भारताने पहिल्या दोन दिवसात वेटलिफ्टिंगमध्ये चांगले यश मिळवले आहे. भारताला आत्तापर्यंत ४ मेडल मिळाले आहेत. यात मीराबाई चानू आणि संजिता चानू यांनी सुवर्णपदकाला गवसणी घातली आहे, तर पी. गुरुराजाने रौप्य पदक आणि दीपक लाठेरने कांस्यपदक जिंकले आहे.
सध्या भारत या चार पदकांसह गुणतालिकेत ५ व्या स्थानी आहे. आज या स्पर्धेचा तिसरा दिवस असून आजही भारताला पदकांची आशा असेल. आज पुरुष हॉकीमध्ये भारताचा सामना पाकिस्तानशी होणार आहे.
राष्ट्रकुल स्पर्धेच्या तिसऱ्या दिवशी(७ एप्रिल) असे असेल सामन्यांचे वेळापत्रक:
(वेळ: भारतीय प्रमाणवेळेनुसार)
पहाटे ४.३० वाजता
लॉन बॉल्स (महिला एकेरी – ५ वी फेरी): पिंकी विरुद्ध पाउलीन
पुरुष ट्रिपल: (५ वी फेरी) : भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका
पहाटे: ४.४० वाजता
आर्टिस्टिक जिम्नॅस्टिक (पुरुष एकेरी ऑल- राऊंड, अंतिम सामना): योगेश्वर सिंग
सकाळी ५ वाजता
वेटलिफ्टिंग (पुरुष ७७ किलो वजनी गट अंतिम सामना) : सतीश कुमार शिवलिगम
टेबलटेनिस (महिला संघ उपांत्यपूर्व फेरी): भारत विरुद्ध मलेशिया
सकाळी ६.०५ वाजता
जलतरण = (पुरुष २०० मीटर बटरफ्लाय): साजन प्रकाश
सकाळी ६. ३१ वाजता
बॅडमिंटन (मिश्र संघ उपांत्यपूर्व फेरी): भारत विरुद्ध मॉरिशस
सकाळी ६.४५ वाजता
जलतरण (पुरुष ५० मीटर बॅकस्ट्रोक): श्रीहरी नटराज
सकाळी ७.३० वाजता
लॉन बाउल्स (पुरुषांची दुहेरी – ५ वी फेरी ): भारत विरुद्ध नॉरफोक आयर्लंड
वूमेन्स फोर – पाचवी फेरी : भारत विरुद्ध फिजी
टेबल टेनिस (पुरुष संघ उपांत्यपूर्व फेरी): भारत विरुद्ध मलेशिया
सकाळी ९.०० वाजता
स्क्वॉश (महिला एकेरी क्लासिक प्लेट उपांत्यपूर्व फेरी): दीपिका पल्लिकल विरुद्ध सामन्था कॉर्नेट
सकाळी ९.०२ वाजता
सायकलिंग ट्रॅक (पुरुष पात्रता फेरी): सानुराज सानंदराज, साहिल कुमार, रणजीत सिंग
सकाळी ९.३० ला
वेटलिफ्टिंग (महिला ६३ किलो फेरी): वंदना गुप्ता
सकाळी १०.०० वाजता
पुरुष हॉकी : भारत विरुद्ध पाकिस्तान
सकाळी ११.४० वाजता
सायकलिंग ट्रॅक (पुरुषांची १५ किमी स्क्रॅचरेस पात्रता फेरी): मनजीत सिंह
दुपारी १२.११ वाजता
आर्टिस्टिक जिमनास्टिक्स (महिला एकेरी ऑल राऊंडची अंतिम फेरी : प्रणति दास
दुपारचे १.०० वाजता
बास्केटबॉल (पुरुषांची प्राथमिक फेरी): भारत विरुद्ध इंग्लंड
दुपारी २.००वाजता
वेटलिफ्टिंग (पुरुष ८५ किलो अंतिम फेरी): वेंकट राहुल रागाला
बास्केटबॉल (महिलांची प्राथमिक फेरी): भारत विरुद्ध मलेशिया
दुपारी २.०२ वाजता
बॉक्सिंग (महिला ६० किलो, १६ वी फेरी) :सरिता देवी विरुद्ध किम्बरली गिटेंस
दुपारी २.४६ वाजता
सायक्लिंग ट्रॅक्स (महिला २५ किमी अंतिम फेरी): मोनोरमा देवी टोंगब्रॅम, सोनाली मयांग्लंबम्
दुपारी ३.०० वाजता
स्क्वॉश (महिला एकेरी उपांत्यपूर्व फेरी): जोशना चिनप्पा वि जॉय किंग
दुपारी ३.१७ वाजता
बॉक्सिंग (पुरुष ५६ किलो, १६वी फेरी): हुसमुद्दीन मोहम्मद व बोए वारवार
दुपारी ३.२९ वाजता
सायकलिंग ट्रॅक (महिला ५०० मीटर टाइम ट्रायल अंतिम फेरी): अलीना रेजी, दबोराह
दुपारी ३.४७ वाजता
बॉक्सिंग (पुरुष ६९ किलो, १६ वी फेरी): मनोज कुमार विरुद्ध कासीम एमबंडवाईक