माजी भारतीय क्रिकेटपटू सुरेश रैना (Suresh Raina) त्याची पत्नी प्रियंका रैना आणि 2 मुलांसह दक्षिण दिल्लीतील एका आलिशान घरात राहतो. रैनाचे हे घर आतून खूप सुंदर आहे. त्याच्या संपूर्ण घराचा व्हिडिओ आता समोर आला आहे. व्हिडिओमध्ये असा दावा केला जात आहे की त्याच्या घराची किंमत 18 कोटी रुपये आहे. रैनाचे 5 खोल्यांचे घर महागड्या वस्तूंनी सजवलेले दिसत आहे.
रैनाच्या या घराचा ड्रॉईंग रूम इतका मोठा आहे की येथे 20 ते 30 लोक आरामात बसू शकतात. या घरात काचेच्या भिंती बसवण्यात आल्या आहेत. ज्यावरून बाहेरील हवामानाचे दृश्य पाहता येते. ज्यामुळे हे घर आणखी सुंदर बनते. या घराच्या भिंती त्याच्या कुटुंबाच्या फोटो फ्रेम्सने सजवलेल्या आहेत. याशिवाय, रैनाचे क्रिकेटशी संबंधित फोटो देखील घराच्या सौंदर्यात भर घालत आहेत. रैनाच्या क्रिकेट कारकिर्दीचे आणि त्याच्या सुवर्ण क्षणांचेही या घरात उत्तम चित्रण करण्यात आले आहे. रैनाची बॅट आणि त्याने जिंकलेल्या ट्रॉफी देखील या घरात सजवल्या आहेत.
सुरेश रैनाने 2020 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. त्यानंतर तो 2021 मध्ये चेन्नई सुपर किंग्जकडून आयपीएलमध्ये खेळला. पण 2022 मध्ये चेन्नईने त्याला रिलीज केले. त्यानंतर रैनाने याच वर्षी क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला. रैनाने भारतासाठी 18 कसोटी, 226 वनडे आणि 78 टी20 सामने खेळले आहेत. रैनाने कसोटीत 768, वनडे सामन्यात 5,615 आणि टी20 मध्ये 1,604 धावा केल्या आहेत. रैना 2011च्या वनडे विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय संघाचा भाग होता.