---Advertisement---

INDvSA: मालिका निर्णायक सामन्यात नाण्याचा कौल भारताच्या बाजूने, पाहा दोन्ही संघाची प्लेईंग इलेवन

INDvSA
---Advertisement---

एक भारतीय पुरुष संघ घरच्या मैदानावर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वनडे मालिका खेळत आहे. तीन सामन्यांच्या या मालिकेत दोन्ही संघांनी एक-एक सामना जिंकल्याने मालिका बरोबरीत राहिली आहे. त्यामुळे मंगळवारी (11 ऑक्टोबर) दिल्ली येथे खेळल्या जाणाऱ्या मालिकेतील शेवटच्या सामन्यात मालिका विजेता ठरणार आहे. हा सामना अरूण जेटली स्टेडियमवर खेळला जाणार आहे. यामुळे दोन्ही संघामध्ये चढाओढ दिसल्यास काही हरकत नाही. डेविड मिलरने दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार म्हणून पदार्पण केले आहे.

भारताचा कर्णधार शिखर धवन (Shikhar Dhawan) याने नाणेफेक जिंकली असून त्याने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. भारतामध्ये कोणताच बदल झाला नसून जो संघ दुसऱ्या सामन्यात खेळला तोच कायम ठेवण्यात आला आहे. दक्षिण आफ्रिकेच्या संघातील काही खेळाडू आजारी पडले असल्याने तिसऱ्या वनडेसाठी संघात तीन बदल झाले आहेत. मागील सामन्यात नेतृत्व करणारा केशव महाराज याचा त्यामध्ये समावेश आहे. तबरेज शम्सी आणि टेम्बा बामुमा हे सलग दुसऱ्या सामन्यास मुकले आहे. कगिसो रबाडा आणि वेन पार्नेल देखील अंतिम अकरामध्ये नाही. त्याजागी मार्को यान्सेन, ऍंंडीले फेलुक्वायो आणि  लुंगी एनगिडी संघात परतले आहेत.

सोमवारी (10 ऑक्टोबर) झालेल्या पावसाने खेळपट्टी ओली झाली होती, त्यामुळे नाणेफेकीस जवळपास एक तास उशिर झाला. तसेच सामना हा 50-50 षटकांचा खेळला जाणार आहे. खेळपट्टी चांगली असली तरी त्याच्यावर कव्हर्स ओढल्याने त्याच्यात थोडा दमटपणा आला आहे.

भारताचा एक संघ टी20 विश्वचषकासाठी ऑस्ट्रेलियात असून रोहित शर्मा, विराट कोहली, केएल राहुल याच्या अनुपस्थितीत भारत खेळत आहेत. तसेच आर अश्विन, हार्दिक पंड्या इतर खेळाडूही टी20 विश्वचषकाच्या संघात आहेत.

शिखर धवन याने याआधी भारताचे दोन वनडे मालिकेत कर्णधापद भुषविले आहे. श्रीलंका आणि वेस्ट इंडिज दौऱ्यात भारताने त्याच्या नेतृत्वाखाली दोन्ही वनडे मालिका जिंकल्या आहेत. यामुळे तो दक्षिण आफ्रिकेविरुद्ध हॅट्ट्रीक साधण्यास सज्ज आहे. या मालिकेत शाहबाज अहमद आणि रुतुराज गायकवाड यांनी भारताच्या वनडे संघात पदार्पण केले आहे.

तिसऱ्या वनडेसाठी दोन्ही संघाची प्लेईंग इलेवन-

भारतीय संघ – शिखर धवन (कर्णधार), शुभमन गिल, श्रेयस अय्यर, इशान किशन, संजू सॅमसन (विकेटकीपर), वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, शाहबाज अहमद, मोहम्मद सिराज, आवेश खान.

दक्षिण आफ्रिका- क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), डेविड मिलर (कर्णधार), जानेमन मलान, रीझा हेंड्रिक्स, एडन मार्कराम, हेनरिक क्लासेन, मार्को यान्सेन, ऍंंडीले फेलुक्वायो, ब्योर्न फॉर्च्युइन, लुंगी एनगिडी, एनरीच नोर्तजे.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘ही’ गोष्ट विजय किंवा पराभवाने ठरत नाही, रविचंद्रन अश्विनचे पीसीबी अध्यक्षांना सडेतोड प्रत्युत्तर
ब्रेकिंग: बीसीसीआयचा नवा अध्यक्ष जाहीर! सौरव गांगुलीनंतर ‘हे’ सांभाळणार पदाचा कार्यभार

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---