मागील काही महिन्यांपासून भारतीय संघाने नेतृत्वाबरोबर फलंदाजी क्रमवारीतही अनेक बदले केले. त्यामधील सलामीला वेगवेगळ्या जोड्यांबाबत अनेक प्रयोग करून पाहिले. जेव्हापासून रोहित शर्मा (Rohit Sharma) भारताचा कर्णधार बनला तेव्हापासूनच या बदलांना सुरूवात झाली. रोहितच्या मतानुसार पहिल्या सहा क्रमांकामध्ये एक डावखुरा फलंदाज असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर त्याने केएल राहुलचेही कौतुक केले. भारताने गुरूवारी (12 जानेवारी) श्रीलंकेविरुद्धचा कमी धावसंख्या असलेला दुसरा वनडे सामना जिंकण्यासाठी सहा विकेट्स गमावल्या. त्यामध्ये पहिले सहा फलंदाज उजव्या हाताने फलंदाजी करणारेच होते यावरून तरी फलंदाजाच्या लाईन-अपचा अंदाज येतो.
भारतीय संघात डाव्या हाताच्या फलंदाजीबाबत बोलले तर ईशान किशन (Ishan Kishan) हा एक उत्तम पर्याय आहे. त्याने नुकतेच वनडेमध्ये जलद द्विशतक करण्याचा विक्रम केला आहे, मात्र त्याला श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेसाठी बाकावर बसवले आहे. कारण शुबमन गिल (Shubman Gill) याने 2022मध्ये जशी कामगिरी केली त्यावरून संघव्यवस्थापक त्याला अधिक संधी देऊ इच्छित आहे.
किशनला का संधी दिली नाही, याचे स्पष्टीकरत देताना रोहित म्हणाला, “पहिल्या सहामध्ये एकतरी डावखुरा फलंदाज असणे आवश्यक आहे, मात्र ज्या खेळाडूंना संधी दिली जात आहे त्यांनी मागील वर्षी अधिक धावा केल्या आहेत.” तसेच काही फलंदाज त्यांचा फलंदाजी क्रमांक सोडण्यास तयार नाही, असेही दिसून आले आहे.
रोहितने केएल राहुलचे कौतुक करताना पुढे म्हटले, “आम्ही सामना जिंकण्याच्या जवळ अगदी जवळ पोहोचलो होते. राहुलला पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करण्याचा अनुभव आहे. त्याने ज्याप्रकारे फलंदाजी केली त्यावरून एका आत्मविश्वास मिळाला आहे.”
श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या वनडे सामन्यात भारतासमोर विजयासाठी 216 धावांचे आव्हान होते. भारत जेव्हा लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानावर उतरला तेव्हा संघाने पहिल्या चार विकेट्स केवळ 86 धावसंख्येवरच गमावल्या. रोहित, विराट कोहली, गिल, श्रेयस अय्यर हे भरवशाचे फलंदाज लवकर तंबूत परतले अशा स्थितीत भारत हरतो की काय असे वाटत असताना राहुलने पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला येत संयमी खेळी केली.
या सामन्यात राहुलने 103 चेंडूत 6 चौकारांच्या सहाय्याने नाबाद 64 धावा केल्या. (INDvSL 2nd ODI Rohit Sharma praises KL Rahul’s ‘match-winning’ knock, but captain has a big comment about selection)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
Maharashtra Kesari Pune: केवळ पंधरा सेकंदात किरण भगतवर बाला रफिकची मात
INDvSL: दुसऱ्या वनडेदरम्यान टीव्ही स्क्रीनवर झळकली द्रविडची आकडेवारी, हेड कोचची रिऍक्शन व्हायरल