लंडन | इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्स भारताविरुद्ध होणाऱ्या टी२० मालिकेतून बाहेर पडला आहे. दुखापतीमुळे त्याने ही माघार घेतली आहे.
याबद्दल इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने मंगळवारी खुलासा केला आहे.
पाकिस्तान विरुद्ध झालेल्या शेवटच्या कसोटी सामन्यात तो जखमी झाला होता. १४ खेळाडूंच्या या संघात आता सॅम आणि टाॅम करण या भावांचा समावेश करण्यात आला आहे. ते इंग्लंडकडून खेळणारे १९९९नंतरचे दुसरे भाऊ ठरणार आहेत.
या मालिकेत वेगवान गोलंदाज मार्क वूडला विश्रांती देण्यात आली असुन जेम्स बाॅल त्याच्याजागी खेळणार आहे. तो आॅस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या एकमेव टी२० तसेच भारताविरुद्ध होणाऱ्या तीन टी२० सामन्यांच्या मालिकेतून बाहेर पडला आहे.
इंग्लंडचा आॅस्ट्रेलिया आणि भारताविरुद्ध होणाऱ्या टी२० मालिकेसाठी संघ-
इयाॅन माॅर्गन (कर्णधार), मोईन अली, जाॅनी बेरस्ट्रो, जॅक बेल, जाॅश बटलर, टाॅम करण, सॅम करण, अॅलेक्स हॅलेक्स, ख्रीस जाॅर्डन, लायम प्लंकेट, अदिल राशिद, जो रुट, डेविड विले