बेंगलोर | आयपीएलच्या पहिल्याच सामन्यात दमदार कामगिरी करणाऱ्या किंग्ज इलेव्हन पंजाबचा संघ आणखी बळकट होणार आहे. कारण लग्नासाठी सुट्टी घेतलेला अॅरॉन फिंच संघामध्ये पुनरागमनासाठी सज्ज झाला आहे.
फिंचने आयपीएलच्या ११ व्या सत्रापर्यंत ७ संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. सात वेगवेगळ्या संघाकडून खेळणारा फिंच हा एकमात्र खेळाडू आहे.
आयपीएलमध्ये सर्वात आधी फिंच राजस्थान रॉयल्स संघाकडून 2010 मध्ये खेळला होता. त्यानंतर दिल्ली डेअरडेव्हिल्स, चेन्नई, कोची आणि पुण्याचेही त्याने प्रतिनिधित्व केले आहे.
2018 च्या आयपीएलसाठी पंजाबने फिंचला 6 कोटी 20 लाखा रुपयांना खरेदी केले आहे.
अॅरॉन फिंच आयपीएलमध्ये ६५ सामने खेळला असून त्यात त्याने २७.१७च्या सरासरीने १६०३ धावा केल्या आहेत. १३ अर्धशतकी खेळी करताना त्याने १७० चौकार आणि ५९ षटकार खेचले आहेत.
फिंचचे काल बेंगलोर शहरात आगमन झाले असून तो बेंगलोरबरोबर होणाऱ्या सामन्यासाठी सज्ज आहे.