आजपासून आयपीएलच्या ११ व्या मोसमाला सुरवात होणार आहे. आज मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स संघात पहिला सामना मुंबईच्या घराच्या मैदानावर म्हणजेच वानखेडे स्टेडिअमवर होणार आहे.
त्याचबरोबर आज या सलामीच्या सामन्याआधी आयपीएलचा झगमगता उदघाटन सोहळाही पार पडणार आहे. या उदघाटन सोहळ्याचे तसेच आयपीएलचे सामन्याचे प्रसारण विविध देशांमध्ये होणार आहे.
भारतात स्टार नेटवर्कच्या चॅनेल्सवरून उदघाटन सोहळ्याचे आणि आयपीएल सामन्यांचे प्रसारण होणार आहे. स्टार इंडियाने २०१८ ते २०२३ या वर्षांसाठी आयपीएलचे प्रसारण हक्क विकत घेतले आहेत.
तसेच आयपीएलचे हॉटस्टार आणि जिओ टीव्ही वरून ऑनलाईन प्रसारणही होणार आहे.
आयपीएलच्या उदघाटन सोहळ्याचे आणि सामन्यांचे विविध देशांमधून या चॅनेल्सवर होणार प्रसारण:
भारत – स्टार नेटवर्क
सयुंक्त अरब अमिराती – विलो
कॅनडा – विलो
कॅरेबियन बेटे – फ्लो
इंग्लंड – स्काय
आफ्रिका – सुपरस्पोर्ट्स
पाकिस्तान – जिओ
बांग्लादेश – चॅनेल ९
ऑस्ट्रेलिया – फॉक्स
न्यूझीलंड – स्काय
अफगाणिस्तान – लेमार