बेंगलुरू | आयपीएलमध्ये आजचा दुसरा सामना रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने दिल्ली डेअरडेविल्स विरूद्ध ६ विकेट्सने जिंकला. या सामन्यात सामनाविर पुरस्कार एबी डी विलीयर्सला देण्यात आला.
त्याने ३९ चेंडूत ९०धावांची खेळी केली. त्यात ५ षटकार आणि १० चौकारांचा समावेश आहे.
परंतू याच सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरकडून चांगली फलंदाजी करत असलेल्या कर्णधार विराट कोहलीला अापली विकेट एका अप्रतिम कॅचमूळे गमवावी लागली. त्याने २६ चेंडूत ३० धावा केल्या.
ट्रेंट बोल्टने सीमारेषेवर विराटचा हा कॅच घेतला. ११व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर हर्षल पटेलच्या गोलंदाजीवर जेव्हा विराटने चेंडू सीमारेषवर मारला तेव्हा क्षेत्ररक्षण करत असलेल्या ट्रेंट बोल्टने पहिल्यांदा हवेत सूर मारला. त्यानंतर अगदी शेवटच्या क्षणाला आपल्या शरीराचा कोणताही भाग सीमारेषेला लागू नये म्हणून मोठे कष्ट घेत हा अप्रतिम झेल टिपला.
विशेष म्हणजे केवळ काही क्षणात हे सर्व घडले. त्यामूळे मैदानावरील पंचांनी तिसऱ्या पंचाची मदत घेतली व त्यात विराट बाद झाल्याचे स्पष्ट दिसले.
पहा विडीओ-
https://twitter.com/Surreycricfan/status/987748451168542721
https://twitter.com/dhaone110/status/987744851012849666
Whattt a Catch!!! #RCBvDD @trent_boult pic.twitter.com/SMF98MxSOg
— Ravi Karthik (@ItzRaviKarthik) April 21, 2018