---Advertisement---

कधी नाही ते जडेजाने काल सोडले झेल, चाहत्यांनी केले जोरदार ट्रोल!

---Advertisement---

कोलकाता | गुरुवारी कोलकाता नाईट रायडर्स आणि चेन्नई सुपर किंग्जमध्ये कोलकाताने ६ विकेट्सने दणदणीत विजय मिळवला. हा विजय कोलकाताला गुणतालिकेत तिसऱ्या स्थानी घेऊन गेला.

या सामन्यात २विकेट्स आणि ३२ धावा करणाऱ्या सुनिल नारायणला सामनावीर पुरस्कार देण्यात आला.

या  सामन्यात भारतीय संघातील स्टार क्षेत्ररक्षक रविंद्र जडेजाने चक्क दोन झेल सोडले. गेली काही वर्ष जडेला क्रिकेट विश्वातील सर्वोत्तम क्षेत्ररक्षक मानले जाते.

असे असले तरी हा खेळाडू सध्या त्याच्या सर्वोत्तम फाॅर्ममध्ये नाही. ९ सामन्यात त्याने केवळ ५९ धावा केल्या आहेत. तर गोलंदाजी करतानाही केवळ ३ विकेट्स घेतल्या आहेत.

काल त्याने सामनावीर ठरलेल्या सुनिल नारायणचे चक्क दोन झेल लागोपाठच्या चेंडूवर सोडले.

हा सर्व प्रकार दुसऱ्या षटकात घडला जेव्हा केएम असिफच्या गोलंदाजीवर घडला. तेव्हा जडेजा मिड आॅनला क्षेत्ररक्षण करत होता.

दुसऱ्या षटकाच्या पाचव्याआणि सहाव्या चेंडूवर हा प्रकार घडला. यावेळी कर्णधार धोनी काहीसा नाराज दिसला तर सुरेश रैना, अंबाती रायडू आणि सॅम बिलिंग्ज या खेळाडूंनी जडेजा जावुन एकप्रकारे समजुत काढली आणि चांगले खेळण्यासाठी प्रेरणा दिली.

तेव्हा नारायण केवळ ६ धावांवर खेळत होता. तेव्हाच जर ही विकेट गेली असती तर कोलकाता संघ दबावात आला असता.

जडेजाच्या या दोन झेल सोडण्यामुळे त्याला मोठ्या प्रमाणावर ट्रोल करण्यात आले.

https://twitter.com/AndColorPockeT/status/992085030275973120?ref_src=twsrc%5Etfw&ref_url=https%3A%2F%2Fsports.ndtv.com%2Findian-premier-league-2018%2Fipl-2018-ravindra-jadeja-drops-consecutive-catches-twitter-questions-his-role-in-the-team-1847032&tfw_site=Sports_NDTV

https://twitter.com/notmanoj/status/992080885460631556?ref_src=twsrc%5Etfw&ref_url=https%3A%2F%2Fsports.ndtv.com%2Findian-premier-league-2018%2Fipl-2018-ravindra-jadeja-drops-consecutive-catches-twitter-questions-his-role-in-the-team-1847032&tfw_site=Sports_NDTV

https://twitter.com/hankypanty/status/992081423468294144

महत्त्वाच्या बातम्या –
Video- ओवरमध्ये जिंकायला हव्या होत्या ५ धावा, घडले असे काही की…

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment