मुंबई । कोविड 19 या साथीच्या आजारामुळे जग सतत बदलत आहे. आणि याच दरम्यान इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) ब्रॉडकास्टर स्टार स्पोर्ट्सनेही सेंच्युरियन पार्क येथे तीन संघांमधील 36 षटकांच्या सामन्यात ‘वर्चुअल कॉमेंट्री’ चा प्रयोग केला. या प्रदर्शनीय सामन्यातील यशस्वी प्रयोगानंतर आता आयपीएलमध्येही अशाच प्रकारचे समालोचन करण्याचा विचार केला जात आहे.
रविवारी दक्षिण आफ्रिकेच्या सेंच्युरियन पार्क येथे खेळल्या गेलेल्या सामन्यात इरफान पठाण याने बडोद्यातील त्याच्या घरातून, कोलकाता येथील दीप दासगुप्ता आणि संजय मांजरेकर यांनी आपल्या मुंबई येथील निवासस्थानावरुन समालोचन केले. माजी भारतीय अष्टपैलू पठाणने आपल्या घरापासून शेकडो किलोमीटर दूर होत असलेल्या सामन्याविषयी समालोचन करण्याच्या अनुभवाचे वर्णन केले.
केवळ समालोचकच नाही तर त्याशी जोडलेले कर्मचारीही देशाच्या इतर भागांतून ‘लॉग इन’ झाले होते. दिग्दर्शक म्हैसूर येथून सर्व गोष्टींवर लक्ष ठेवून होते. सुरुवातीचे मुद्दे सोडले गेले तर प्रयोग यशस्वी झाला आणि आगामी काही आयपीएलमध्येही समालोचक घरी बसून कॉमेंट्री करू शकतील. हे हिंदी आणि इंग्रजी भाषेत शक्य नसले तरी ते तमिळ, तेलगू आणि कन्नड अशा प्रादेशिक भाषांमध्येही असा प्रयोग केला जाऊ शकते.
पठाण म्हणाले, “हा एक विलक्षण अनुभव होता. मला काळजी वाटत होती. कारण इंटरनेटचा वेग कमी जास्त होऊ शकला असता तर आवाजाच्या गुणवत्तेवर परिणाम झाला असता. जेव्हा सामना थेट असतो तेव्हा काहीही होऊ शकते कारण तंत्रज्ञान पूर्णपणे आपल्या नियंत्रणाखाली नाही. हा प्रदर्शन सामना असला तरी प्रत्येकजण त्याकडे गांभिर्याने घेत होता. स्टार आपली योजना चांगली बनवतो, पण आयपीएलमध्ये घरातून समालोचन करणे हे एक मोठे आव्हान असेल.”
या माजी अष्टपैलूने सांगितले की, “कोणीही त्याचे लक्ष वळवू नये म्हणून तो एका खोलीत एकटाच बसला होता, परंतु त्याचा मुलगा सारखे दरवाजा ठोठावत होता.”
आयपीएल दरम्यान मुंबईत पॅनेलची चर्चा होत असते, त्यात पठाणदेखील यात सहभागी झाला होता. प्रक्षेपण क्षेत्राशी संबंधित तज्ज्ञांचे मत आहे की, भविष्यात जगातील कोणत्याही ठिकाणाहून समालोचन करणे सोपे होऊ शकते.