---Advertisement---

मोठी बातमी: चेन्नई सुपर किंग्जला आणखी एक धक्का, सुरेश रैनानंतर या खेळाडूने आयपीएलमधून घेतली माघार

---Advertisement---

मुंबई । इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) फ्रेंचायझी संघ चेन्नई सुपर किंग्ज (सीएसके) ला आणखी एक मोठा धक्का बसला आहे.  सुरेश रैना नंतर टीमच्या आणखी एका वरिष्ठ खेळाडूने वैयक्तिक कारणांमुळे, आयपीएलच्या 13 व्या हंगामातून माघार घेण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. संघातील वरिष्ठ फिरकी गोलंदाज हरभजन सिंगने वैयक्तिक कारणास्तव स्पर्धेतून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. भज्जी म्हणाला की, वैयक्तिक कारणास्तव आपण या हंगामात स्पर्धेत भाग घेऊ शकणार नाही.

40 वर्षीय भज्जी यांनी शुक्रवारी सांगितले की, ‘मी सीएसके व्यवस्थापनाला याबद्दल सांगितले आहे की, यंदा मी आयपीएलमध्ये खेळू शकणार नाही. वैयक्तिक कारणास्तव या वर्षी ब्रेक घेण्याचे ठरविले आहे. मला आशा आहे की लोक माझ्या निर्णयाचा आदर करतील.’

 

भज्जी संघासह संयुक्त अरब अमिराती (युएई) साठी रवाना झाला नाही, नंतर तो संघात सामील होतील असे बोलले जात होते.  सुरेश रैना संघासह दुबईला पोहोचला, मात्र  रैनाने वैयक्तिक कारणे सांगून आयपीएल 2020 मधून माघार घेण्याचा निर्णय घेतला आणि दुबईहून भारतात परतला.

भज्जी हा आयपीएलच्या इतिहासातील सर्वात यशस्वी गोलंदाजांपैकी एक आहे. भज्जीने आयपीएलमध्ये 150 बळी घेतले आहेत.

 

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---