नवी दिल्ली| बीसीसीआयने यंदा युएईमध्ये होणार्या इंडियन प्रीमियर लीगची तयारी सुरू केली असून जवळपास सर्वच संघ मैदानावर प्रशिक्षण घेत असल्याचे दिसून आले आहे. दरम्यान, किंग्ज इलेव्हन पंजाबचे क्षेत्ररक्षण प्रशिक्षक जॉन्टी र्होड्स यानी बीसीसीआयकडून खेळाडूंच्या चांगल्या तयारीसाठी विशेष मागणी केली आहे. त्याचा असा विश्वास आहे की कोरोना विषाणूमुळे खेळाडू बरेच काळ मैदानापासून दूर आहेत, म्हणून सामन्याच्या परिस्थितीशी जुळवून घेण्यासाठी त्यांचा सराव सामना घेणे आवश्यक आहे.
आयपीएलमध्ये जवळपास दोन वर्षानंतर परतत असलेला जॉन्टी म्हणाला की, कोरोना व्हायरस हेल्थ प्रोटेक्शन प्रोटोकॉलमुळे बहुतेक कुटुंब आणि मित्रांपासून दूर असलेल्या खेळाडूंना भावनिक आधार देण्याची जबाबदारीही त्यांच्यासारख्या कोचिंग स्टाफची आहे.
खेळाडूंसाठी सराव सामने घेणे आवश्यक आहे
उल्लेखनीय आहे की कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर यंदा 19 सप्टेंबरपासून युएईमध्ये आयपीएलचे आयोजन केले जात आहे, ज्यामुळे बीसीसीआय जैविक सुरक्षित मानक प्रक्रियेचे काटेकोरपणे पालन करीत आहे. हे पाहता, बहुतेक खेळाडूंनी त्यांच्या कुटुंबाला सोबत न घेण्याचा निर्णय घेतला आहे.
यावर र्होड्सने म्हटले की, ‘कौशल्याच्या दृष्टीने सर्व खेळाडू लयीत परतले आहेत आणि नेटवर त्यांचा नैसर्गिक खेळ दाखवत आहेत, जो मनोरंजक आहे. लॉकडाऊन दरम्यान ते जास्त सराव करू शकत नव्हते. त्यामुळे सामन्याचा सराव होण्यासाठी आणि सामना खेळण्याची मानसिकता तयार होण्यासाठी आम्ही एक किंवा दोन सराव सामने खेळून परिस्थितीशी जुळवून घेण्याच्या प्रयत्नात आहोत.’
खेळाडूंना भावनिक बळ देण्याची जबाबदारी प्रशिक्षकांवर असते
तो म्हणाला, “स्पर्धेतील कामगिरीत चढउतार येत राहतात आणि प्रशिक्षकांची जबाबदारी आहे की कुटुंब नसल्याने खेळाडूंना भावनिक आधार द्यावा.”
किंग्ज इलेव्हन पंजाब संघ: अर्शदीप सिंग, ख्रिस गेल, ख्रिस जॉर्डन, दर्शन नालकंडे, दीपक हूडा, ग्लेन मॅक्सवेल, कृष्णाप्पा गौतम, हरदास विल्जॉइन, हरप्रीत पार, ईशान पोरेल, जगदीश सुचित, जेम्स नीशम, करुण नायर, केएल राहुल, मनदीप सिंह, मयंक अग्रवाल, मोहम्मद शमी, मुजीब उर रहमान, मुरुगन अश्विन, निकोलस पूरन, प्रभासीमरण सिंग, रवी बिश्नोई, सरफराज खान, शेल्डन कॉटरल आणि तेजिंदर ढिल्लन.