fbpx
Saturday, January 23, 2021
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

लसिथ मलिंगा नसला की मुंबईचं काही खरं नसतं, पहा इतिहास काय सांगतोय?

September 4, 2020
in IPL, क्रिकेट, टॉप बातम्या
0
Photo Courtesy: Facebook/IPL

Photo Courtesy: Facebook/IPL


मुंबई । इंडियन प्रीमियर लीग 2020 अद्याप सुरू झालेला नाही. पण त्या आधीच या स्पर्धेतून स्टार खेळाडू बाहेर पडायला सुरुवात झाली आहे. आयपीएलच्या 13 व्या हंगामापूर्वी चेन्नई सुपर किंग्ज आणि मुंबई इंडियन्स या स्पर्धेतील दोन सर्वात यशस्वी संघांना मोठा धक्का बसला आहे. चेन्नई सुपर किंग्जकडून सर्वाधिक धावा करणारा पहिला फलंदाज सुरेश रैनाने, वैयक्तिक कारणास्तव आयपीएल 2020 मधून माघार घेतली. आता मुंबई  इंडियन्सचा स्टार गोलंदाज लसिथ मलिंगाने कोरोना विषाणूमुळे आयपीएल 2020 न खेळण्याचा निर्णय घेतला.

लसिथ मलिंगा आयपीएलमधील सर्वात धोकादायक गोलंदाजांपैकी एक आहे. या स्टार गोलंदाजाने दमदार कामगिरी करत मुंबई इंडियन्सला अनेक सामने जिंकून दिले आहेत. अशा परिस्थितीत मलिंगाचे न खेळणे मुंबई इंडियन्सला चांगलेच महागात पडू शकते हे निश्चित. वास्तविक पाहता मलिंगाची अनुपस्थिती ही मुंबई इंडियन्ससाठी अपशकुनसारखी आहे.

मुंबई इंडियन्सकडे जरी एकापेक्षा एक दर्जेदार वेगवान गोलंदाज असले तरी त्या गोलंदाजांकडे लसिथ मलिंगा इतका अनुभव नाही. तसेच, त्याची अनुपस्थिती देखील संघासाठी वाईट मानली जाते. हे आकडेवारी सांगत आहे. जेव्हा मलिंगा मुंबई इंडियन्सच्या संघाबाहेर राहिला आहे, तेव्हा आयपीएल मधील मुंबई इंडियन्सची कामगिरी खराब झाली आहे.

2008 साली लसिथ मलिंगा मुंबई इंडियन्सच्या संघात नव्हता, तेव्हा संघ गुणतालिकेत पाचव्या क्रमांकावर होता. 2016 मध्ये लसिथ मलिंगा पुन्हा आयपीएल खेळला नाही, मुंबई इंडियन्स पुन्हा पाचव्या क्रमांकावर राहिला. 2018 मध्ये, मलिंगा मुंबई इंडियन्सबरोबर होता, परंतु गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून आणि त्यानंतरही असेच घडले. वर्ष 2018 मध्ये मुंबई इंडियन्स पाचव्या क्रमांकावर होती. 2020 मध्ये मलिंगा पुन्हा संघात नाही, आता या हंगामात मुंबई इंडियन्सचे काय होईल? असा चाहत्यांना प्रश्न पडला आहे.

लसिथ मलिंगाची जागा भरुन काढणे मुंबई इंडियन्ससाठी सोपे नाही. संघाने मलिंगाच्या जागी प्रतिभावान गोलंदाज जेम्स पॅटिनसनला संघात स्थान दिले आहे, परंतु श्रीलंकेच्या या वेगवान गोलंदाजाचा अनुभव मोठा आहे आणि त्याला पर्याय नाही. मलिंगानेच आयपीएल 2019 च्या अंतिम सामन्यात शेवटच्या षटकात शानदार गोलंदाजी केली. शेवटच्या षटकात चेन्नई सुपर किंग्जला 9 धावांची गरज होती, रोहितने मोठ्या विश्वासाने चेंडू मलिंगाच्या हाती दिला आणि त्याने अवघ्या 7 धावा देत संघाला विजय मिळवून दिला आणि मुंबई इंडियन्स चौथ्यांदा चॅम्पियन बनला.

लसिथ मलिंगा हा आयपीएलमधील सर्वात यशस्वी गोलंदाज आहे. आयपीएलमध्ये त्याने 122 सामन्यात सर्वाधिक 170 बळी घेतले आहेत. मलिंगाने आयपीएलमध्ये फक्त 70 डावांमध्ये सर्वात वेगवान 100 विकेट पूर्ण केल्या. सर्वात वेगवान 150 विकेट पूर्ण करण्याचा विक्रमही त्याच्या नावावर आहे, त्याने ही कामगिरी केवळ 105 डावात केली. आयपीएलमध्ये मलिंगा हा एकमेव वेगवान गोलंदाज आहे, ज्याने चार आयपीएल संघांविरुद्ध 20 पेक्षा जास्त बळी घेतले आहेत.

मलिंगाने चेन्नई सुपर किंग्ज, दिल्ली कॅपिटल, किंग्ज इलेव्हन पंजाब आणि कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध 20 पेक्षा जास्त बळी घेतले आहेत.  मलिंगाचे महत्त्व फक्त विकेटपुरते मर्यादित नाही तर सामन्याच्यावेळी रणनीती आखताना मलिंगा नेहमी रोहित शर्माला सहकार्य करतो. जसप्रीत बुमराहसारख्या खेळाडूची गोलंदाजी सुधारण्याचे श्रेय मलिंगाला जाते. आयपीएल 2020 मध्ये मलिंगाची कमतरता मुंबई इंडियन्सला त्रासदायक ठरु शकते.


Previous Post

अखेर आयपीएलचे वेळापत्रक ‘या’ तारखेला होणार जाहीर; स्वत: बीसीसीआय अध्यक्ष गांगुलीने केला खुलासा 

Next Post

सुशांत सिंग केसमध्ये समोर आले विराट कोहली-रोहित शर्मा कनेक्शन

Related Posts

Photo Courtesy: www.iplt20.com
क्रिकेट

RCB ने खरेदी केलेले DC चे ‘हे’ दोन धुरंदर यंदा संघाला जिंकून देऊ शकतात ट्रॉफी!

January 23, 2021
Photo Courtesy: Twitter/ BCCI
क्रिकेट

पासा पलट गया! एकवेळ शास्त्रींना ट्रोल करणारे चाहतेच मागतायत त्यांची क्षमा, जाणून घ्या कारण

January 23, 2021
Photo Curtsey: Facebook/Bal Thackeray
क्रिकेट

गोष्ट त्या क्रिकेटरची, ज्याची प्रतिभा अक्षरक्ष: बाळासाहेब ठाकरेंना मैदानावर येण्यास भाग पाडायची

January 23, 2021
Photo Curtsey: Twitter/BBL
क्रिकेट

चेन्नई सुपर किंग्स, याला संघात घ्या! अवघ्या ५१ चेंडूत शतक करणाऱ्या ‘त्या’ पठ्ठ्यासाठी नेटकऱ्यांची मागणी

January 23, 2021
Photo Curtsey: Twitter/ICC
क्रिकेट

बाळासाहेबांचे क्रिकेट प्रेम! केवळ दहा मिनिटे सामना बघेन म्हणतं शेवटपर्यंत जागेवरुन हाललेही नाहीत

January 23, 2021
Photo Courtesy: Twitter/BCCI
क्रिकेट

“वॉशिंग्टन सुंदरकडे ब्रिस्बेन कसोटीत खेळण्यासाठी पॅड्स नव्हते, मग..”, प्रशिक्षकाचा मोठा खुलासा

January 23, 2021
Next Post
Photo Courtesy: Instagram/Sushant Singh Rajput

सुशांत सिंग केसमध्ये समोर आले विराट कोहली-रोहित शर्मा कनेक्शन

Photo Courtesy: Twitter/ ICC

आयसीसी टी-२० क्रमवारी: डेव्हिड मलान पहिल्या ५ मध्ये परतला, हाफिजलाही झाला फायदा

Photo Courtesy: Twitter/ IPL

आयपीएल २०२०: सर्व संघांना दिले गेले ब्लूटूथ सक्षम बॅज; सर्व डेटा जाणार बीसीसीआयकडे

ADVERTISEMENT
Maha Sports

© 2020.

Navigate Site

  • About Us

Follow Us

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2020.