नवी दिल्ली| चेन्नई सुपर किंग्ज संघाने नेटमध्ये सराव सुरू केला आहे. सराव सुरू करणारा चेन्नई संघ शेवटचा संघ आहे. या संघात दीपक चहर आणि ऋतुराज गायकवाड यांच्यासह मागील आठवड्यात १३ सदस्य कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते. यामुळे, संपूर्ण संघाला आणखी काही दिवस क्वारंटाईन राहायला भाग पडले. यावेळी सुरेश रैना आणि हरभजन सिंग यांनीही आयपीएलमधून माघार घेतली.
या सर्व समस्यांमधून सावरल्यानंतर संघाने अखेर सराव सुरू केला आहे. दरम्यान, एमएस धोनीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे, ज्यामध्ये चाहते आयसीसी अकॅडेमीबाहेर धोनीची झलक पाहायला पोहचले.
आयसीसी अकॅडेमीमध्ये सराव करून जेव्हा धोनी हॉटेलमध्ये परत येत होता, तेव्हा कोरोनाच्या भीतीदरम्यानही मोठ्या संख्येने उभे असलेल्या चाहत्यांनी त्याच्यासाठी जोरदार घोषणाबाजी केली. अनेक चाहत्यांनी आयसीसी अकॅडेमीमध्ये त्यांच्या आवडत्या खेळाडूची झलक पहिली आणि धोनी बाहेर आल्यामुळे चाहते आनंदी झाले. धोनीनेही हात हलवून चाहत्यांना अभिवादन केले.
Dhoni….Dhoni…Chants 💥🔥 pic.twitter.com/PhqeYzMB7v
— MSDiann (@MSDiann7) September 5, 2020
Second embedded, Dhoni ke naam 😍pic.twitter.com/lII1rlougR
— titli • (@cassiopeiahazel) September 5, 2020
चेन्नई सुपर किंग्ज संघाला मैदानात पाहून चाहत्यांना खूप आनंद झाला. सराव सत्रात संघाने जोरदार सराव केला. धोनीनेही नेटमध्ये फलंदाजीचा सराव केला. चेन्नई सुपर किंग्जचा संघ ज्या पद्धतीने सराव करीत आहे, ते पाहता असे दिसते की संघ सलामीच्या सामन्यासाठी पूर्णपणे सज्ज आहे. आयपीएलच्या या हंगामाचे वेळापत्रक अद्याप जाहीर झालेले नाही.