भारताचा सलामीवीर फलंदाज शिखर धवन (Shikhar Dhawan) 2019च्या विश्वचषकापासून बऱ्याच दुखापतींना सामोरे गेला आहे. आता त्याला रविवारी(19 जानेवारी) ऑस्ट्रेलिया विरुद्ध तिसरा वनडे सामना खेळताना डाव्या खांद्याला दुखापत झाली आहे.
त्याला या सामन्यात ऑस्ट्रेलिया प्रथम फलंदाजी करत असताना 5 व्या षटकात ऍरॉन फिंचने कव्हरच्या क्षेत्रात मारलेला चेंडू आडवण्याच्या नादात दुखापत झाली आहे. त्यामुळे त्याने या सामन्यात फलंदाजीही केली नाही.
या दुखापतीमुळे त्याला न्यूझीलंड दौऱ्यालाही मुकावे लागले आहे. तसेच आता तो आयपीएल 2020चे (IPL 2020) सुरुवातीचे काही सामनेही खेळणार नसल्याची शक्यता आहे.
टाईम्स नाऊच्या अहवालानुसार, धवन पुढील 10 आठवडे क्रिकेटपासून दूर राहील. याचा अर्थ, तो आयपीएलमधील काही सामने दिल्ली संघाकडून खेळणार नाही. त्यामुळे श्रेयस अय्यरच्या (shreyas Iyer) नेतृत्वाखाली खेळणाऱ्या दिल्ली संघाला मोठा फटका बसणार आहे. आयपीएलचा 13वा हंगाम मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात सुरू होईल.
आयपीएल 2020 ला सुरुवात होण्याआधी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारतीय संघाची वनडे मालिका होणार आहे. या मालिकेतही धवन न खेळण्याची दाट शक्यता आहे.
बीसीसीआयने (BCCI) दिलेल्या माहितीनुसार, धवन राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये फेब्रुवारीच्या पहिला आठवड्याच दुखापतीनंतरचे प्रशिक्षण घेईल.
24 जानेवारीपासून सुरु होणाऱ्या न्यूझीलंडविरुद्ध आंतरराष्ट्रीय टी20 मालिकेत त्याचा बदली खेळाडू म्हणून युवा यष्टीरक्षक फलंदाज संजू सॅमसनला संधी देण्यात आली आहे.
बीसीसीआयने करारही केला नाही, आता विराट धोनीचं यात विक्रमातून नाव हटवणार
वाचा👉https://t.co/CVYWczpYoj👈#म #मराठी #Cricket #TeamIndia #NZvIND @imVkohli— Maha Sports (@Maha_Sports) January 23, 2020
बरोबर ३ वर्षांपुर्वी वनडे पदार्पण केलेल्या बुमराहबद्दल जगाला या ३ गोष्टी माहित नाहीत
वाचा👉https://t.co/is14Rya8cK👈#म #मराठी #Cricket #TeamIndia @Jaspritbumrah93— Maha Sports (@Maha_Sports) January 23, 2020