आयपीएल 2020चा हंगाम जवळ आला आहे. हा आयपीएलचा 13वा हंगाम असणार आहे. गुरुवारी (19 डिसेंबर) आयपीएलचा लिलाव पार पडला. या लिलावात ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज पॅट कमिन्सवर (15.50 कोटी) सर्वाधिक बोली लागली.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष (BCCI) सौरव गांगुली (Sourav Ganguly) यांनी ऑस्ट्रेलियाचा वेगवान पॅट कमिन्स आयपीएल (IPL) लिलावात इतक्या मोठ्या किंमतीला का गेला याचे कारण सांगितले आहे.
कमिन्सवर गुरुवारी आयपीएलच्या फ्रँचायझींमध्ये जोरदार बोली लावली गेली. अखेर लीगच्या 13 व्या हंगामासाठी त्याला दोन वेळच्या चॅम्पियन असलेल्या कोलकाता नाईट रायडर्सने (Kolkata Knight Riders) सर्वाधिक 15.50 कोटींची बोली लावत विकत घेतले.
गांगुलीला वाटते की हा छोटा लिलाव होता. त्यामुळे कमिन्सला जास्त मागणी होती आणि म्हणूनच त्याची किंमत नेत्रदीपक ठरली.
“नाही, मला वाटत नाही (कमिन्सची किंमत जास्त आहे). याचा संबंध मागणीशी आहे. विशेषत: असे छोटे लिलाव अशा खेळाडूंच्या मागे जाण्यासाठीच असतात. बेन स्टोक्सही (Ben Stokes) अशाच छोट्या लिलावाचा एक भाग बनला होता आणि म्हणूनच त्याचे मूल्य 14 कोटींवर गेले होते,” असे कोलकात्यातील एका कार्यक्रमाच्या वेळी गांगुली म्हणाला.
कमिन्स हा आयपीएल 2020 च्या लिलावातील सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. या लिलावात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (Royal Challengers Bangalore) आणि दिल्ली कॅपिटलमध्ये (Delhi Capitals) कमिन्सला आपल्या संघात घेण्यासाठी चढाओढ सुरू होती. पण त्याची किंमत वाढत असतानाच कोलकाताने मध्येच बोलीमध्ये प्रवेश करत त्याला खरेदी केले.
अबब १५ कोटींची लागली बोली#म #मराठी #IPLAuction2020 @Mazi_Marathi @BeyondMarathi #Cricket pic.twitter.com/VF56l97dzw
— Maha Sports (@Maha_Sports) December 19, 2019
आयपीएलच्या लिलावाच्या इतिहासातील सर्व खेळाडूंमध्ये कमिन्स हा दुसरा महागडा खेळाडू आहे. या यादीत अव्वल क्रमांकावर युवराज सिंग (Yuvraj Singh) आहे. युवराजला दिल्ली डेअरडेव्हिल्सने 2015च्या आयपीएल लिलावात 16 कोटींमध्ये खरेदी केले होते.
कमिन्स कोलकाता नाईट रायडर्सकडून दुसऱ्यांदा आयपीएलमध्ये खेळताना दिसणार आहे. त्याने 2014 मध्ये या संघाचे आयपीएलमध्ये प्रतिनिधित्व केले आहे.
बुमराहच्या फिटनेस टेस्टबद्दल सौरव गांगुलीने केले मोठे भाष्य; म्हणाला…
वाचा- 👉https://t.co/Yw8uIzHIUQ👈#म #मराठी #TeamIndia #Cricket @Mazi_Marathi @MarathiRT— Maha Sports (@Maha_Sports) December 20, 2019
फिंच आरसीबी संघात आल्याने हा जूना व्हिडिओ होतोय जोरदार व्हायरल
वाचा- 👉 https://t.co/NbFKDj5EFc👈#म #मराठी @Mazi_Marathi @BeyondMarathi @MarathiRT
#IPLAuction2020— Maha Sports (@Maha_Sports) December 20, 2019