काही महिन्यांपूर्वीच आयपीएलचा 13 वा हंगाम युएईमध्ये पार पडला. या हंगामाचे विजेतेपद मुंबई इंडियन्सने जिंकले. पण आता सर्वांचे लक्ष आयपीएलच्या 14 व्या हंगामाकडे लागले आहे. आयपीएलच्या 14 व्या हंगामासाठी जय्यत तयारी सुरू असून, यासंदर्भात रोज वेगवेगळ्या बातम्या समोर येत आहेत. नुकत्याच पुढे आलेल्या बातमीनुसार 11 फेब्रुवारी रोजी आयपीएल 2021 साठीची लिलाव प्रक्रिया पार पडू शकते.
त्यामुळे आयपीएल संघांना 21 जानेवारीपर्यंत संघात कायम केलेल्या खेळाडूंची यादी जाहीर करणे देखील गरजेचे झाले आहे.
बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने आयपीएल संदर्भात माहिती दिली आहे. त्या अधिकाऱ्याने सांगितले की, यावर्षी आयपीएल भारतात होणार अथवा नाही या संदर्भातला निर्णय सय्यद मुश्ताक अली टी 20 ट्रॉफीच्या यशानंतर घेतला जाईल. जर सय्यद मुश्ताक अली टी 20 ट्रॉफी दरम्यान काही अडचणी आल्या, तर पुन्हा एकदा आयपीएल दुबईमध्ये खेळले जाऊ शकते.
अधिकाऱ्याने पुढे स्पष्ट केले की, संघांना 21 जानेवारीपर्यंत संघात कायम केलेल्या खेळाडूंची यादी सोपवणे गरजेचे आहे. आयपीएलच्या लिलावाची तारीख 11 फेब्रुवारी असू शकते असेही ते म्हणाले.
आयपीएल 2020 च्या समाप्तीनंतरच वेगवेगळ्या बातम्या समोर येत होत्या की आयपीएल 2021 मध्ये 2 नवीन संघ असू शकतील. मात्र नंतर स्पष्ट करण्यात आले की कालावधी कमी असल्याने दोन नवीन संघ आयपीएल 2022 वेळी दाखल होतील. त्यामुळे 2021 चा हंगाम 8 संघांसहच खेळवला जाईल.
महत्त्वाच्या बातम्या –
डेव्हिड वॉर्नरला बाद करण्यासाठी वसीम जाफरने पंतला दिला ‘हा’ सिक्रेट मेसेज
किवींकडून पाकिस्तान चारीमुंड्या चीत; झेलावा लागला २० वर्षातील दुसरा सर्वात मोठा पराभव
…आणि त्यादिवशी कपिल देव यांनी ठरवले की भारताचा यशस्वी वेगवान गोलंदाज होऊनच दाखवेल