इंडियन प्रीमीयर लीगच्या १४ व्या हंगामाला येत्या ९ एप्रिलपासून सुरुवात होणार आहे. त्यामुळे आता जवळपास केवळ १५ दिवसांचा कालावधी राहिलेल्या या हंगामासाठी जवळपास सर्व संघांची तयारी सुरु झाली आहे. आयपीएलमधील कोलकाता नाइट रायडर्स (केकेआर) संघातील काही खेळाडूंनी देखील मुंबईत हजेरी लावायला सुरुवात केली आहे.
कोलकाता संघातील दिनेश कार्तिक, वरुण चक्रवर्ती, राहुल त्रिपाठी, कमलेश नागरकोटी, संदीप वॉरियर, वैभव अरोरा या खेळाडूंनी मुंबई आयपीएलच्या तयारीसाठी हजेरी लावली आहे. त्याबरोबर सहाय्यक प्रशिक्षक अभिषेक नायर आणि गोलंदाजी प्रशिक्षक ओंकार साळवी यांनीही हजेरी लावली आहे.
केकेआरने ट्वीट करताना लिहले आहे की, “ही क्वारंनटाईन होण्याची वेळ आहे. या होणाऱ्या हंगामासाठी आमचे खेळाडू येत आहेत. शिबिर लवकरच सुरू होणार आहे.”
IT'S QUARANTIME and the #Knights are checking in for the season! ✅
The beginning of the camp is just around the corner… ⏳@DineshKarthik @abhisheknayar1 @ImRTripathi #KamleshNagarkoti #HaiTaiyaar #IPL2021 pic.twitter.com/KM84PxOPw9
— KolkataKnightRiders (@KKRiders) March 21, 2021
यासोबतच केकेआर संघात सहभागी होणारे काही परदेशी खेळाडू देखील मुंबईला येण्यासाठी निघाले आहेत. याबद्दलही केकेआरने ट्विट केले आहे.
बीसीसीआयच्या मार्गदर्शक सूचनांनुसार सर्व खेळाडू, सहाय्यक कर्मचारी आणि संघ व्यवस्थापन यांना हॉटेलच्या खोल्यांमध्ये सात दिवस क्वारंटाईन राहावे लागेल. त्यानंतर सर्वजण बायोबबलमध्ये प्रवेश करतील.
महत्त्वाच्या बातम्या –
न्यूझीलंडचा माजी वेगवान गोलंदाज डॅनी मॉरिसन यांचे हिंदी ऐकून तुम्हीही व्हाल थक्क ; व्हिडिओ पहा..