आयपीएल २०२१ च्या उर्वरित सामन्यांना रविवारी (१९ सप्टेंबर) यूएईमध्ये सुरुवात होणार आहे. आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यातील पहिला सामना मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज या दोन संघात रंगणार आहे. चेन्नई सुपर किंग्ज संघाला कर्णधार महेंद्रसिंग धोनीकडून खूप अपेक्षा आहेत. रविवारी होणाऱ्या सामन्याआधीतो चांगल्या फार्ममध्ये दिसला आहे. चेन्नईच्या सराव सत्रादरम्यान धोनी जबरदस्त फलंदाजी करताना दिसला आहे. चेन्नई सुपर किंग्जने त्यांच्या यूट्यूब चॅनलवर धोनीचा सराव सत्रातील एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत धोनी मैदानाच्या चारी बाजूला मोठे शाॅट मारताना दिसला आहे.
चेन्नईने त्यांच्या अधिकृत यूट्यूब चॅनेलवर धोनीचा हा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत धोनी मोठ मोठे शाॅट मारताना दिसत आहे. धोनीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून चाहत्यांना तो खूप आवडला आहे.
हा व्हिडिओ पाहून असे वाटत आहे की, तो त्याच्या जुन्या अंदाजामध्ये परतला आहे. तो चांगल्या फार्ममध्ये दिसत आहे. चेन्नई सुपर किंग्ज संघासाठी हे चांगले संकेत आहेत. आयपीएल २०२१ च्या पहिल्या टप्प्यात धोनी साजेशा फार्ममध्ये दिसला नव्हता. त्यानंतर आता दुसऱ्या टप्प्यामध्ये तो त्याच्या चांगल्या फॉर्ममध्ये परतल्याचे दिसल्यामुळे चाहते आनंदात आहेत.
आयपीएल २०२१ च्या पहिल्या टप्प्यातील ६ सामन्यांमध्ये धोनीने केवळ ३७ धावा केल्या होत्या. धोनीच्या नेतृत्वाच चेन्नईने पहिल्या टप्प्यात ७ सामने खेळले आणि त्यातील ५ जिंकले. सीएसके संघ १० गुणांसह गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे. आता त्यांच्या पहिला सामना मुंबईविरुद्ध असून मुंबईचा संघ गुणतालिकेत चौथ्या स्थानावर आहे.
आयपीएल २०२० कोरोनाच्या कारणास्तव यूएईमध्येच खेळली गेली होती. त्यावेळी चेन्नई सुपर किंग्जला यूएईमध्ये काही कमाल करता आली नव्हती आणि संघ स्पर्धेच्या प्लेऑफमध्येही स्थान मिळवू शकला नाही. अशात यावर्षी आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यात संघ काय कमाल करतो? हे पाहावे लागणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
झिम्बाब्वेचा दुसऱ्या टी२०त सनसनाटी विजय, अंतिम षटकात स्कॉटलंडच्या घेतल्या ४ विकेट्स
आयपीएल, टी२० विश्वचषक मग दिग्गज क्रिकेटर्ससाठी ‘ही’ नवी लीग; युएईत क्रिकेट स्पर्धांचा भरणार मेळावा