आयपीएल 2020 ची काही महिन्यांपूर्वीच समाप्ती झाली असून, आता सर्वांच्या नजरा आयपीएल 2021 कडे लागल्या आहेत. अशाच आयपीएल प्रेमींसाठी आनंदाची बातमी समोर येत असून 16 फेब्रुवारी रोजी आयपीएल 2021 साठीचा लिलाव पार पडण्याची शक्यता आहे. आयपीएल संघांना कायम केलेल्या खेळाडूंची यादी 20 जानेवारीपर्यंत जाहीर करण्याची मुदत देखील देण्यात आलेली आहे.
आयपीएल 2021 साठीच्या लिलाव प्रक्रियेत खेळाडूंना नाव नोंदणी करण्यासाठी ऑनलाईन व ऑफलाईन सुविधा देण्यात आली आहे. ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी खेळाडूंना 4 फेब्रुवारीपर्यंत मुदत देण्यात आलेली आहे, तर ऑफलाईनसाठी 12 फेब्रुवारी ही अंतिम तारीख असणार आहे. दरवर्षी हजारो युवा भारतीय तसेच विदेशी खेळाडू क्रिकेटच्या या महाकुंभात आपले नशीब आजमावत असतात.
आयपीएल लिलावामध्ये सर्वात जास्त रक्कम किंग्ज इलेव्हन पंजाब संघाकडे असून त्यांच्याकडे 16.5 कोटी रुपये आहेत. तसेच राजस्थानकडे 14.5 कोटी, हैदराबादकडे 10.1 कोटी व दिल्लीकडे 9 कोटी रुपये आहेत.
लिलावामध्ये सर्वात कमी रक्कम चेन्नई सुपर किंग्सकडे असून, एमएस धोनी कर्णधार असलेल्या ह्या संघाकडे केवळ 15 लाख रुपये आहेत. मुंबई इंडियन्सकडे 1.95 कोटी, रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरकडे 6.4 कोटी तर केकेआरकडे 9 कोटी रुपये आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
भारताकडून ‘असा’ पराक्रम करणारा वॉशिंग्टन सुंदर तिसराच खेळाडू
गेट वेल सून टीम इंडिया! ब्रिस्बेन कसोटीदरम्यान चाहतीने झळकावले अनोखे पोस्टर, फोटो व्हायरल
दुर्दैवी! सांगलीत क्रिकेट खेळताना मैदानातच हृदयविकाराचा झटका आल्याने युवकाचा मृत्यू