काही महिन्यांपूर्वीच आयपीएलचा १३ वा हंगाम युएईमध्ये पार पडला. या हंगामाचे विजेेतेपद मुंबई इंडियन्सने जिंकले. आता हा हंगाम संपून दोन महिने होत आहेत आणि आता १४ व्या आयपीएल हंगामाचे बिगुलही वाजले आहेत. बुधवारी(२० जानेवारी) सर्व आयपीएलमधील सहभागी फ्रँचायझींनी त्यांच्या संघात कायम केलेल्या आणि संघातून मुक्त केलेल्या खेळाडूंची यादी जाहीर केली आहे.
विराट कोहली कर्णधार असलेल्या रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाने त्यांच्या संघातील १२ खेळाडूंना कायम केले आहे. तर १० खेळाडूंना मुक्त केले आहे. कायम केलेल्या खेळाडूंमध्ये कर्णधार विराट कोहली, एबी डिविलियर्स, युजवेंद्र चहल, देवदत्त पड्डीकल, वॉशिंग्टन सुंदर, मोहम्मद सिराज, नवदीप सैनी, ऍडम झम्पा, शाहाबाज अहमद, जोश फिलिप, केन रिचर्डसन आणि पवन देशपांडे यांचा समावेश आहे.
IPL Retention Announcement 🔊 Here’s the news you’ve been waiting for, 12th Man Army. We have retained 12 stars from our 2020 squad. 🌟🤩#PlayBold #IPL2021 #WeAreChallengers pic.twitter.com/YkzSV3EUjU
— Royal Challengers Bengaluru (@RCBTweets) January 20, 2021
आरसीबीने मुक्त केलेल्या खेळाडूंमध्ये मोईन अली, शिवम दुबे, गुरकिरत सिंग मन, ऍरॉन फिंच, ख्रिस मॉरिस, पवन नेगी, इसरु उडाना आणि उमेश यादव यांचा समावेश आहे. तर पार्थिव पटेल निवृत्त झाल्याने आणि डेल स्टेन उपलब्ध नसल्याने संघातून मुक्त झाले आहेत.
बेंगलोर संघाला २०२१ मध्ये त्यांच्या पहिल्या आयपीएल विजेतेपदाची प्रतिक्षा असेल.