---Advertisement---

‘आरसीबीच्या ड्रेसिंग रूममध्ये प्रत्येकजण करतो फाफ डू प्लेसिसचा आदर’, बेंगलोरच्या विस्फोटक खेळाडूचे वक्तव्य

RCB-Team
---Advertisement---

रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचा माजी कर्णधार विराट कोहलीने मागील वर्षीच कर्णधार पदाचा राजीनामा दिला होता. त्याच्यानंतर बेंगलोर संघाने आयपीएल २०२२च्या लिलावात आपल्या ताफ्यात घेतलेल्या फाफ डू प्लेसिसवर विश्वास दाखवत कर्णधार बनवले. त्याच्या नेतृत्वात संघाने ३ सामने खेळले आहेत. त्यातील २ सामन्यात विजय, तर एका सामन्यात संघाला पराभव स्वीकारावा लागला आहे. अशात बेंगलोरचा आक्रमक फलंदाज ग्लेन मॅक्सवेलला असा विश्वास आहे की, डू प्लेसिस चांगली कामगिरी करेल. कारण, ड्रेसिंग रूममध्ये त्याला संघसहकाऱ्यांकडून सन्मान मिळताना दिसत आहे.

आपल्या लग्नामुळे आयपीएल २०२२च्या (IPL 2022) सुरुवातीचे काही सामने खेळू न शकणारा ग्लेन मॅक्सवेल (Glenn Maxwell) ९ एप्रिल रोजी मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात खेळण्याची शक्यता आहे. मॅक्सवेल म्हणाला की, मुंबईला पोहोचल्यानंतर त्याने खूप कठोर सराव केला आहे आणि तो सामन्यात उतरण्यासाठी खूपच उत्सुक आहे.

या सामन्यात उतरण्यापूर्वी मॅक्सवेलने दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार आणि बेंगलोरचा सध्याचा कर्णधार फाफ डू प्लेसिसचे (Faf Du Plessis) कौतुक केले आहे. मॅक्सवेल आरसीबी ‘बोल्ड डायरीज’वर बोलताना म्हणाला, “आम्हाला वाटते की, तो फ्रँचायझीसह शानदार काम करेल आणि ज्या पद्धतीने त्याने सुरुवात केली, तुम्ही असे म्हणू शकता की, ड्रेसिंग रूममध्ये प्रत्येकजण त्याचा आदर करतो. तो केवळ उदाहरणच देत नाही, तर चमकदार कामगिरीही करतो.”

मात्र, मॅक्सवेलने स्पष्ट केले की, इतर वरिष्ठ खेळाडूंनीही कर्णधाराला कोणत्याही अडचणीशिवाय काम करण्यासाठी मदत करणे आवश्यक आहे. मॅक्सवेलवर ३६ वर्षीय अनुभवी दिनेश कार्तिकचा खूप प्रभाव आहे, जो अजूनही उत्कृष्ट कामगिरी करत आहे. तो म्हणाला, “मी पाहत होतो आणि मला वाटते अनुज रावत खूप उत्साही आहे. जुना मित्र दिनेश कार्तिकच्या कामगिरीमुळे खूपच रोमांचित आहे.”

मॅक्सवेल म्हणाला, “तो उत्कृष्ट आहे. उत्कृष्ट फॉर्ममध्ये धावत आहे. तरीही योगदान देत आहे. 2013 मध्ये मी त्याच्यासोबत मुंबईत खेळलो. नऊ वर्षांनंतर, आम्ही पुन्हा एकदा त्याच ड्रेसिंग रूमचा भाग आहोत. त्याला अशी फलंदाजी करताना पाहून खूप आनंद होतो. आम्हाला फलंदाजीच्या क्रमात अशी खोली आवडते,” असेही पुढे बोलताना तो म्हणाला.

मॅक्सवेलने आयपीएलमध्ये ९७ सामन्यांतील ९३ डावांमध्ये फलंदाजी करताना २५.२३च्या सरासरीने २०१८ धावा केल्या आहेत. या धावा करताना त्याने १२ अर्धशतके ठोकली आहेत.

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा

महत्वाच्या बातम्या –

पदार्पणाच्या सामन्यातच ‘बेबी एबी’ने ठोकला गगनचुंबी ‘नो लूक सिक्स’, व्हिडिओ पाहून तुम्हीही कराल कौतुक

‘आम्ही कधीच अपेक्षा केली नव्हती, तो ज्यापद्धतीने आला…’, वाचा पराभवानंतर कमिन्सबद्दल काय म्हणाला रोहित

LSG vs DC | नाणेफेक जिंकत राहुलचा प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय, दिल्लीच्या ताफ्यात २ धुरंधरांची एन्ट्री

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---