दक्षिण अफ्रिकेचा फिरकी गोलंदाज तबरेज शम्सीला आयपीएल २०२२ च्या मेगा लिलावात एकही खरेदीदार मिळाला नाही. मागच्या वर्षी शम्सीने आंतरराष्ट्रीय टी-२० मध्ये जबरदस्त प्रदर्शन केले होते. पण तरीदेखील आयपीएलमध्ये त्याला कोणत्याच संघाने खरेदी केले नाही. याच पार्श्वभूमीवर आता त्याने स्वतः नाराजी व्यक्त केली आहे.
मागच्या वर्षीचा सर्वोत्तम टी-२० फिरकी गोलंदाज ठरलेल्या शम्सीने एका माध्यमाला दिलेल्या मुलाखतीत नाराजी व्यक्त केली आहे. त्याच्या मते मेगा लिलावात त्याला एखाद्या संघाने खरेदी केले असते आणि त्याला खेळण्याची संधी मिळाली असती, तर तो संघाला विजेतेपद देखील मिळवून देऊ शकत होतो.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
“एका खेळाडूच्या रूपात तुम्हाला तुमची क्षमता दाखवण्यासाठी नियमित खेळावे लागते. जेणेकरून तुम्ही तुमच्या कारकिर्दीला दिशा देऊ शकाल. जेव्हा इमरान ताहिर दक्षिण आफ्रिका संघासोबत होता, तेव्हा मला खेळण्याच्या नियमित संधी मिळत नव्हत्या. परंतु जेव्हापासून तो संघातून बाहेर पडला, तेव्हापासून मी नियमित खेळत आहे. यामुळेच मी टी-२० मधील पहिल्या क्रमांकाचा गोलंदाज बनू शकतो.”
दरम्यान, शम्सी मागच्या काही वर्षांमध्ये दक्षिण आफ्रिकेचा स्टार फिरकी गोलंदाजाच्या रूपात नावारूपाला आला आहे. त्याने ४७ टी-२० आंतरराष्ट्रीय टी-२० सामन्यांमध्ये ५७ विकेट्स घेतल्या आहेत. आयपीएल २०१६-१८ मध्ये त्याने आरसीबीचे प्रतिनिधित्व केले आहे. मागच्या हंगामात तो राजस्थान रॉयल्सकडून खेळत होता, पण राजस्थानसाठी फक्त एक सामना खेळण्याची संधी त्याला मिळाली.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
INDvsSA: आयपीएलदरम्यान होणार बैठक, रोहितच्या अनुपस्थितीत ‘हा’ खेळाडू बनू शकतो टीम इंडियाचा कर्णधार
अशोका इलेव्हन, उत्कर्ष क्रीडा मंच ब आणि युनिक वानवडीचा पहिला विजय
निवृत्तीनंतर यूटर्न घेणारा रायुडू पहिलाच नव्हे, ‘या’ ५ क्रिकेटर्सनीही निर्णय बदलत केले होते पुनरागमन