आयपीएलची सर्वात यशस्वी फ्रँचायझी मुंबई इंडियन्सला चालू हंगामात मात्र अपेक्षित प्रदर्शन करता आलेले नाहीय. हंगामातील सलग चौथ्या सामन्यात मुंबईला पराभव मिळाला असून चाहत्यांची चांगलीच निराशा झाली आहे. रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने शनिवारी (दि. ०९ एप्रिल) मुंबई इंडियन्सला ७ विकेट्स राखून पराभूत केले. सामना संपल्यानंतर मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा खूपच निराश दिसला. तसेच त्याची पत्नी रितिका सजदेहच्या चेहऱ्यावर नाराजी स्पष्ट दिसत होती.
आरसीबीसाठी या सामन्यात अनुज रावतने ६६, तर माजी कर्णधार विराट कोहलीने ४८ धावा केल्या. आरसीबीला जेव्हा विजय मिळाला, तेव्हा स्टॅन्डमध्ये बसलेली रोहितची पत्नी रितिका सजदेह (Ritika Sajdeh) एकदम स्तब्द होती. रोहित शर्मा (Rohit Sharma) त्यावेळी जड अंतकरणासह आरसीबीच्या खेळाडूंसोबत हातमिळवणी करत होता आणि रितिका त्याच्याकडे पाहत बसली होती. आयपीएलने त्यांच्या अधिकृत ट्विटर खात्यावरून या प्रसंगाचा व्हिडिओ शेअर केला आहे.
That's that from Match 18 as @RCBTweets win by 7 wickets.
This is #RCB's third win on the trot in #TATAIPL.
Scorecard – https://t.co/12LHg9xdKY #RCBvMI #TATAIPL pic.twitter.com/fU98QRPisL
— IndianPremierLeague (@IPL) April 9, 2022
मुंबई इंडियन्सला आयपीएल २०२२मध्ये अद्याप एकही विजय मिळला नाहीये. पहिल्या चारपैकी एकही सामना संघाला जिंकता आला नसल्यामुळे गुणतालिकेत संघ सध्या ९व्या स्थानावर आहे. चेन्नई सुपर किंग्ज (CSK) गुणतालिकेत १०व्या क्रमांकावर आहे. सीएसकेने देखील हंगामातील सर्वच्या सर्व ४ सामने गमावले आहेत. विशेष गोष्ट ही आहे की, आयपीएलच्या इतिहासात मुंबई आणि चेन्नई हे दोन संघ सर्वाधिक वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकले आहेत आणि चालू हंगामातील त्यांची अशी खराब अवस्था झाली आहे.
मुंबई इंडियन्सने आतापर्यंत ५ वेळा, तर सीएसकेने आतापर्यंत ४ वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकली आहे. परंतु या हंगामात या संघासाठी पुढचा प्रवास खूपच खडतर असणार आहे. आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर मुंबईला त्यांचा पुढचा सामना पंजाब किंग्जसोबत खेळायचा आहे, जो १३ एप्रिल रोजी होईल. स्पर्धेत राहण्यासाठी मुंबईला त्यांचा पुढचा प्रत्येक सामना जिंकावा लागणार आहे. अशात पंजाबविरुद्धच्या सामन्यात अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
‘फक्त पहिला विजय मिळूद्या, मग…’, मुंबई इंडियन्सच्या खराब फॉर्मविषयी झहीर खानचे मोठे वक्तव्य