आयपीएल 2023 मध्ये सोमवारी (10 एप्रिल) रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध लखनऊ सुपरजायंट्स यांच्या दरम्यान सामना खेळला गेला. चिन्नास्वामी स्टेडियम येथे झालेल्या या सामन्यात नाणेफेकीचा कौल लखनऊचा कर्णधार केएल राहुल याच्या बाजूने लागला. त्याने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेत आरसीबीला फलंदाजीसाठी आमंत्रित केले.
https://twitter.com/IPL/status/1645419419227811848
आरसीबी संघ या हंगामातील आपला तिसरा सामना खेळण्यासाठी मैदानात उतरला. या सामन्यासाठी आरसीबीने आपल्या संघात काही महत्त्वपूर्ण बदल केले. अष्टपैलू मायकल ब्रेसवेल याच्या जागी वेगवान गोलंदाज वेन पार्नेल याचा समावेश केला गेला. तर, आकाश दीपच्या जागी अष्टपैलू महिपाल लोमरोर याला संधी देण्यात आली आहे.
लखनऊ संघात देखील या सामन्यासाठी तीन बदल केले गेले. मागील सामन्याला मुकलेला मार्क वूड हा पुन्हा संघात परतला आहे. तसेच आवेश खान याला देखील पुनरागमनाची संधी देण्यात आली. ते दोघे रोमारियो शेफर्ड व यश ठाकूर यांची जागा घेतील.
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विराट कोहली, फाफ डू प्लेसिस (कर्णधार), दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), ग्लेन मॅक्सवेल, महिपाल लोमरोर, शाहबाज अहमद, डेविड विली, अनुज रावत, हर्षल पटेल, वेन पार्नेल, मोहम्मद सिराज.
लखनऊ सुपर जायंट्स केएल राहुल (कर्णधार), काईल मेयर्स, मार्कस स्टॉयनिस, दीपक हुड्डा, कृणाल पंड्या, निकोलस पूरन (यष्टीरक्षक), अमित मिश्रा, मार्क वूड, जयदेव उनाडकत, रवी बिश्नोई, आवेश खान
(IPL 2023 Lucknow Supergiants Won Toss rcb Bat First)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
रिंकूने दाखवली खिलाडूवृत्ती! 5 षटकार ठोकल्यानंतर त्या गोलंदाजाला केला मेसेज, म्हणाला…
मिचेल मार्शच्या आयुष्यातील सर्वात खास दिवस, प्रेयसी ग्रेटा मॅकसोबत अडकला लग्नबंधनात, पाहा फोटो