---Advertisement---

घरच्या मैदानावर आरसीबीचा दणदणीत विजय! दिल्लीचा सलग पाचवा पराभव, वैशाकचे दमदार पदार्पण

---Advertisement---

आयपीएल 2023 चा 20 वा सामना रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात खेळला गेला. बेंगलोरच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात आरसीबीने सलग दोन पराभवानंतर विजय नोंदवला. 175 धावांचा पाठलाग करताना दिल्लीचा संघ 151 पर्यंतच मजल मारू शकला. यासह आरसीबीने 23 धावांनी विजय संपादन केला. आरसीबीच्या विजयात अनुभवी विराट कोहली व पदार्पण करणारा वेगवान गोलंदाज वैशाक विजयकुमार यांचे मोलाचे योगदान राहिले.

https://twitter.com/IPL/status/1647233375667892224?t=HmP5S474UqDPA-WaTRZ00w&s=19

 

दिल्लीचा कर्णधार डेव्हिड वॉर्नर याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. विराट कोहली आणि कर्णधार फाफ डू प्लेसिस यांनी संघाला वादळी सुरुवात मिळवून दिली. विराटने 50, तर डू प्लेसिसने 22 धावांची महत्वपूर्ण योगदान दिले. पहिल्या विकेटसाठी दोघांमध्ये 28 चेंडू 42 धावांची भागीदारी देखील पार पडली. विराटने 34 चेंडूवर 6 चौकार व एका षटकाराच्या मदतीने 50 धावा केल्या.

विराटच्या अर्धशतकानंतर मॅक्सवेल याने 24 धावांची खेळी केली. मात्र, अनुज रावतच्या संथ खेळीने संघाचा डाव 200 पर्यंत जाऊ शकला नाही. शहाबाज अहमदने काही आक्रमक फटके खेळल्याने संघ 174 पर्यंत पोहोचू शकला. दिल्लीसाठी कुलदीप यादव व मिचेल मार्श यांनी प्रत्येकी दोन बळी मिळवले.

या धावांचा पाठलाग करताना दिल्लीला अपेक्षित सुरुवात करता आली नाही. पृथ्वी शॉ पुन्हा एकदा शून्यावर धावबाद झाला. त्यानंतर मार्श देखील खाते खोलू शकला नाही. यश धूलही केवळ एकच धाव करू शकला. तर, कर्णधार डेव्हिड वॉर्नरने 19 धावा केल्या. पावर प्ले समाप्त होईपर्यंत दिल्लीने 30 धावांवर 4 गडी गमावले होते. अभिषेक पोरेलही लवकरच बाद झाला. अशा स्थितीत मनीष पांडेने एकतर्फी झुंज देत अर्धशतक झळकावले. त्याला अक्षर पटेलने 21 धावा करत साथ दिली. अमन खानने 18 व एन्रिक नोर्कीएने नाबाद 23 धावा करत दिल्लीच्या पराभवाचे अंतर कमी केले. दिल्लीचा हा स्पर्धेतील सलग पाचवा पराभव आहे. त्यांनी अद्यापही आपल्या गुणांचे खाते उघडले नाही.

(IPL 2023 Royal Challengers Banglore Beat Delhi Capitals By 23 Runs Virat Kohli Vyshak Vijay Kumar Shines)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-

अखेर बुमराह-श्रेयसच्या दुखापतीवर बीसीसीआयने दिले अपडेट, अशी आहे पुढील रणनीती
RCB vs DC । दिल्ली कॅपिटल्सने जिंकली नाणेफेक, प्रथम गोलंदाजीचा निर्णय, ‘अशी’ आहे प्लेइंग इलेव्हन

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---