---Advertisement---

फिल सॉल्टची तुफानी खेळी, कोलकाताचा लखनऊवर शानदार विजय; मिशेल स्टार्कनं घेतल्या 3 विकेट

---Advertisement---

इंडियन प्रीमियर लीगच्या 17 व्या हंगामातील 28 व्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सनं लखनऊ सुपर जायंट्सचा 8 गडी राखून पराभव केला. रविवारी (१4 एप्रिल) ईडन गार्डन्सवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात कोलकाताला विजयासाठी 162 धावांचं लक्ष्य होतं, जे त्यांनी 16व्या षटकातच गाठलं. कोलकाताचा लखनऊविरुद्धचा हा पहिला विजय ठरला. याआधी ते लखनऊविरुद्धचे शेवटचे तीन सामने हरले होते.

सलामीवीर फलंदाज फिल सॉल्ट कोलकाता नाईट रायडर्सच्या विजयाचा हिरो ठरला. सॉल्टनं 47 चेंडूत 14 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीनं नाबाद 89 धावा केल्या. कर्णधार श्रेयस अय्यरनं सॉल्टला चांगली साथ दिली. श्रेयसनं 100 च्या स्ट्राईक रेटनं नाबाद 38 धावा केल्या, ज्यात सहा चौकारांचा समावेश होता.

श्रेयस आणि सॉल्ट यांच्यात तिसऱ्या विकेटसाठी 120 धावांची नाबाद भागीदारी झाली. या भागीदारीमुळे लखनऊला सामन्यात पकडच मिळवता आली नाही. आयपीएलच्या या हंगामात पाच सामन्यांतील कोलकाताचा हा चौथा विजय ठरला. दुसरीकडे, लखनऊचा हा सहा सामन्यांतील तिसरा पराभव आहे.

तत्पूर्वी, नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना लखनऊ सुपर जायंट्सनं 7 विकेट्स गमावून 161 धावा केल्या. लखनऊकडून निकोलस पूरननं सर्वाधिक 45 धावांची खेळी खेळली. पूरननं 32 चेंडूंच्या खेळीत 4 षटकार आणि 2 चौकार लगावले. कर्णधार केएल राहुलनं 39 धावा (27 चेंडू, 3 चौकार, 2 षटकार) आणि आयुष बदोनीनं 29 धावांचं (27 चेंडू, 2 चौकार, एक षटकार) योगदान दिलं. कोलकाताकडून मिचेल स्टार्कनं अप्रतिम गोलंदाजी करत 3 बळी घेतले. तर सुनील नारायण, वैभव अरोरा, आंद्रे रसेल आणि वरुण चक्रवर्ती यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.

दोन्ही संघांच्या प्लेइंग 11 

कोलकाता नाईट रायडर्स – फिलिप सॉल्ट (विकेटकीपर), सुनील नारायण, व्यंकटेश अय्यर, श्रेयस अय्यर (कर्णधार), अंगक्रिश रघुवंशी, आंद्रे रसेल, रमणदीप सिंग, मिचेल स्टार्क, हर्षित राणा, वैभव अरोरा, वरुण चक्रवर्ती

लखनऊ सुपर जायंट्स – क्विंटन डी कॉक, केएल राहुल (कर्णधार/विकेटकीपर), दीपक हुडा, आयुष बदोनी, मार्कस स्टोइनिस, निकोलस पूरन, क्रुणाल पांड्या, रवी बिश्नोई, मोहसिन खान, शामर जोसेफ, यश ठाकूर

महत्त्वाच्या बातम्या –

लखनऊचे करोडो रुपये पाण्यात! दीपक हुडा पुन्हा एकदा ठरला फ्लॉप

धवनच्या अनुपस्थितीत फोटोशूटला जितेश शर्मा आला होता, मग राजस्थानविरुद्ध सॅम करननं नेतृत्व का केलं? पंजाबनं दिलं स्पष्टीकरण

पंजाब किंग्ज अडचणीत, कर्णधार शिखर धवन दुखापतग्रस्त; जाणून घ्या किती सामने खेळणार नाही

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---