आयपीएल 2024 च्या आजच्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्स आमनेसामने आहेत. कोलकात्याच्या ईडन गार्डन्स स्टेडियमवर हा सामना खेळला जातोय. राजस्थान रॉयल्सनं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला.
राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसन – आम्ही प्रथम गोलंदाजी करू. या विकेटवर धावांचा पाठलाग करणं चांगलं असू शकतं. ईडन गार्डन्समध्ये परत येण्यासाठी खूप उत्सूक आहोत. स्टेडियममध्ये छान वातावरण आहे. जोस (बटलर) आणि ॲश (आर अश्विन) या सामन्यासाठी उपलब्ध आहेत.
कोलकाताचा कर्णधार श्रेयस अय्यर – आम्हालाही गोलंदाजी करायला आवडलं असतं. जेव्हा जेव्हा तो (सुनील नारायण) मैदानावर येतो तेव्हा त्याला खेळणं कठीण असतं. त्यानं अशीच कामगिरी करावी अशी आमची इच्छा आहे. आमच्या संघात कोणताही बदल नाही.
दोन्ही संघांच्या प्लेइंग 11
राजस्थान रॉयल्स – यशस्वी जयस्वाल, संजू सॅमसन (कर्णधार/विकेटकीपर), रियान पराग, ध्रुव जुरेल, शिमरॉन हेटमायर, रोवमन पॉवेल, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, आवेश खान, कुलदीप सेन, युजवेंद्र चहल
कोलकाता नाईट रायडर्स – फिलिप सॉल्ट (विकेटकीपर), सुनील नारायण, अंगक्रिश रघुवंशी, श्रेयस अय्यर (कर्णधार), व्यंकटेश अय्यर, रिंकू सिंह, आंद्रे रसेल, रमणदीप सिंग, मिचेल स्टार्क, वरुण चक्रवर्ती, हर्षित राणा
कोलकाता आणि राजस्थाननं या हंगामात चमकदार कामगिरी केली आहे. केकेआरने आतापर्यंत पाचपैकी चार सामने जिंकले असून ते गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील संघानं अखेरच्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्सचा आठ गडी राखून पराभव केला होता. केकेआरचा स्टार वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कनं या सामन्यात धारदार गोलंदाजी करत तीन विकेट घेतल्या होत्या.
दुसरीकडे, संजू सॅमसनच्या नेतृत्वाखालील राजस्थान रॉयल्स गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहे. आरआरनं सहा पैकी पाच सामने जिंकले असून एका सामन्यात त्यांचा पराभव झालाय. राजस्थाननं त्यांच्या शेवटच्या सामन्यात पंजाब किंग्जचा 3 गडी राखून पराभव केला होता. या सामन्यात युवा सलामीवीर यशस्वी जयस्वालनं 39 धावांची खेळी खेळली होती. जोस बटलर दुखापतीमुळे तो सामना खेळला नव्हता.
दोन्ही संघांच्या हेड-टू-हेड रेकॉर्डबद्दल बोलायचं झालं तर, कोलकाता आणि राजस्थान यांच्यात अटीतटीची स्पर्धा राहिली आहे. दोन्ही संघांनी आपापसात एकूण 28 सामने खेळले असून, त्यापैकी कोलकातानं 14 वेळा तर राजस्थाननं 13 सामने जिंकले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
मोठी बातमी! ग्लेन मॅक्सवेलनं आयपीएल मधून घेतला ब्रेक, मानसिक थकव्यामुळे हवी विश्रांती
“आरसीबीला विकून टाका…”, सततच्या पराभवामुळे दिग्गज टेनिसपटूचा संताप; बीसीसीआयला दिला अजब सल्ला