आयपीएल 2024 मध्ये आजच्या 26व्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्स आणि दिल्ली कॅपिटल्स आमनेसामने आहेत. लखनऊच्या अटल बिहारी वाजपेयी एकना स्टेडियमवर हा सामना खेळला जातोय. लखनऊ सुपर जायंट्सनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला.
लखनऊचा कर्णधार केएल राहुल –आम्ही प्रथम फलंदाजी करू. माझ्याकडे याचे उत्तर नाही. आम्हाला नवीन सुरुवात करायची आहे. विकेट चांगली दिसते. मला वाटत नाही की दव काही भूमिका बजावेल. त्यामुळे खूप फरक पडला आहे. तुम्ही चांगली गोलंदाजी करू शकता, चांगली फलंदाजी करू शकता, स्वत:ला व्यक्त करू शकता. फलंदाज येथे फलंदाजीचा आनंद लुटत आहेत. मयंक यादवच्या जागी अर्शद खान टीममध्ये आला आहे.
दिल्लीचा कर्णधार ऋषभ पंत – आम्हीही प्रथम फलंदाजी केली असती. आमचे काही खेळाडू जखमी झाले आहेत, त्यामुळे योग्य प्लेइंग इलेव्हन शोधण्याची गरज आहे. आमच्या संघात दोन बदल आहेत. मुकेश आणि कुलदीप परत आले आहेत. ते जखमी झाले होते. त्यांना पुन्हा मैदानात पाहण्याची उत्सुकता होती.
दोन्ही संघांच्या प्लेइंग 11
लखनऊ सुपर जायंट्स – क्विंटन डी कॉक, केएल राहुल (कर्णधार/विकेटकीपर), देवदत्त पडिक्कल, मार्कस स्टॉइनिस, निकोलस पूरन, आयुष बदोनी, क्रुणाल पांड्या, अर्शद खान, रवी बिश्नोई, नवीन-उल-हक, यश ठाकूर
दिल्ली कॅपिटल्स – पृथ्वी शॉ, डेव्हिड वॉर्नर, शाई होप, ऋषभ पंत (कर्णधार/विकेटकीपर), ट्रिस्टन स्टब्स, अक्षर पटेल, जेक फ्रेझर-मॅकगर्क, कुलदीप यादव, मुकेश कुमार, इशांत शर्मा, खलील अहमद
आयपीएलच्या या हंगामात लखनऊ सुपर जायंट्सनं आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे. केएल राहुलच्या नेतृत्वाखालील संघ गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर आहे. लखनऊनं शेवटचे तीन सामने जिंकले आहेत.
दुसरीकडे, दिल्ली कॅपिटल्सचा संघ विजयी मार्गावर परतण्यास इच्छुक आहे. ऋषभ पंतच्या नेतृत्वाखालील संघाची कामगिरी अत्यंत निराशाजनक झाली आहे. दिल्लीच्या संघानं चेन्नई सुपर किंग्जसारख्या बलाढ्य संघाविरुद्धचा सामना जिंकला असला तरी अन्य चार सामन्यांमध्ये चांगली कामगिरी करूनही दिल्लीला विजय मिळवता आला नाही. गुणतालिकेत संघ शेवटच्या स्थानावर आहे.
लखनऊचा वेगवान गोलंदाज मयंक यादव या सामन्यात खेळणार नाही. ही लखनौसाठी निश्चितच चांगली बातमी नाही. चालू हंगामात त्यानं दोनदा सामनावीराचा पुरस्कार पटकावला आहे. मयंकमध्ये ताशी 150 किमीपेक्षा जास्त वेगानं गोलंदाजी करण्याची क्षमता आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
हार्दिक पांड्याविषयी ‘हे’ काय बोलला ईशान किशन! जाणून घ्या एका क्लिकवर
निवृत्तीच्या प्रश्नावर रोहित शर्माची गुगली! टीम इंडियातील भवितव्याबद्दल म्हणाला…
“माझ्याविरुद्ध डोपिंगचा कट रचला जाऊ शकतो”, विनेश फोगाटचे WFI अध्यक्षांवर गंभीर आरोप