---Advertisement---

पंजाबविरुद्ध मुंबई इंडियन्सनं केली चीटिंग? डगआऊटमधून दिला रिव्ह्यू घेण्याचा इशारा; नक्की काय घडलं?

---Advertisement---

आयपीएल 2024 दरम्यान अंपायर आणि तिसऱ्या अंपायरचे निर्णय अनेकवेळा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. गुरुवारी (18 एप्रिल) पंजाब किंग्ज विरुद्ध मुंबई इंडियन्स सामन्यादरम्यान देखील हेच पाहायला मिळालं. या सामन्यात मुंबई इंडियन्सवर चीटिंगचे आरोप लावले जात आहेत.

वास्तविक, जर अंपायरच्या निर्णयाला आव्हान द्यायचं असेल तर दोन्ही टीम रिव्ह्यू घेऊ शकते. टीम रिव्ह्यू घ्यायचा की नाही याचा निर्णय मैदानावरच घेते. पॅव्हलेयनमध्ये बसलेल्या सपोर्ट स्टाफ आणि अन्य खेळाडूंचं यामध्ये काहीच योगदान नसतं. मात्र पंजाब किंग्जविरुद्ध मुंबई इंडियन्सनं घेतलेल्या रिव्हू्यूदरम्यान त्यांना डगआऊट मधून मदत मिळाली. हे पाहून पंजाबचा कर्णधार सॅम करन चांगलाच चिडला होता.

ही घटना मुंबई इंडियन्सच्या डावाच्या 15व्या षटकातील आहे. अर्शदीप सिंगनं सूर्यकुमार यादवला टाकलेला षटकाचा चौथा चेंडू वाईड होता, मात्र अंपायरनं तो वाईड दिला नाही. काही सेकंदांनंतर जेव्हा मुंबईच्या सपोर्ट स्टाफनं रिप्लेमध्ये या चेंडूला पाहिलं तेव्हा त्यांनी सूर्याला रिव्ह्यू घेण्यास सांगितलं. डगआऊट मधून आलेला संदेश मानून सूर्यानं रिव्ह्यू घेतला. थर्ड अंपायरनं सूर्याच्या रिव्ह्यूनंतर चेंडू चेक केला आणि त्याला वाईड घोषित केलं. यानंतर पंजाबचा कर्णधार सॅम करन फार रागात दिसला.

 

थर्ड अंपायरची दुसरी चुकी डावाच्या 19व्या षटकात झाली. सॅम करननं षटकातील तिसरा चेंडू ऑफ स्टम्पच्या बाहेर टाकला. टिम डेव्हिडनं या चेंडूवर कट शॉट मारण्याचा प्रयत्न केला, जो यशस्वी झाला नाही. अंपायरनं या चेंडूला वाईड दिलं नाही. मात्र टिम डेव्हिडनं अंपायरच्या या निर्णयाला आव्हान दिलं. थर्ड अंपायरनं रिप्ले पाहिल्यानंतर या चेंडूला वाईड घोषित केलं. मात्र रिप्लेमध्ये स्पष्ट दिसत होतं की, चेंडू टिम डेव्हिडच्या बॅटच्या खालून गेला आहे म्हणजेच तो त्याच्या रेंजमध्ये होता. अंपायरच्या या निर्णयावर देखील जोरदार टीका होत आहे.

महत्त्वाच्या बातम्या –  

‘इम्पॅक्ट प्लेअर’ नियम भारतासाठी धोकादायक! जहीर खाननं उपस्थित केले अनेक प्रश्न, म्हणाला…

रोहित शर्माने मोडला पोलार्डचा विक्रम! मुंबई इंडियन्ससाठी अशी कामगिरी करणारा ‘हिटमॅन’ पहिलाच फलंदाज

‘तु वेडा आहेस का…’ चालू सामन्यात आपल्याच सहकाऱ्यावर भडकला कुलदीप, पंतने केले वातावरण शांत – पाहा व्हिडिओ

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---