आज 2020 आयपीएलसाठी कोलकाता येथे लिलाव सुरु आहे. आज 338 खेळाडूंचा लिलाव होणार असून यामध्ये पहिल्यांदा ख्रिस लीन या ऑस्ट्रेलियाच्या दिग्गज खेळाडूवर बोली लागली.
लीनवर मुंबई इंडियन्सने बोली लावली असून त्यांनी त्याला 2 कोटी या त्याच्या मुळ किंमतीत संघात सामील करुन घेतले आहे. त्यामुळे आता लीन 2020 आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळताना दिसेल.
Chris Lynn is sold to Mumbai Indians for INR 200L
— IndianPremierLeague (@IPL) December 19, 2019
लीनला यावर्षी लिलावाआधी कोलकाता नाईट रायडर्सने मुक्त केले होते. त्यामुळे सर्वांनी आश्चर्य व्यक्त केले होते.
लीनने आयपीएलमध्ये 41 सामने खेळले असून यात त्याने 33.68 च्या सरासरीने 1280 धावा केल्या आहेत. यामध्ये त्याच्या 10 अर्धशतकांचा समावेश आहे.
कोहली-पोलार्डच्या विकेटमुळे ४८ वर्षांच्या वनडे क्रिकेट इतिहासात घडला अजब विक्रम
वाचा👉https://t.co/v85KhNwhci👈#म #मराठी #Cricket @Mazi_Marathi @BeyondMarathi @MarathiRT #INDvsWI— Maha Sports (@Maha_Sports) December 19, 2019
एबी डिव्हिलियर्सचे होणार आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन?
वाचा- 👉https://t.co/GQPQhCYh31👈#म #मराठी #Cricket @Mazi_Marathi @BeyondMarathi
@MarathiRT #abdevilliers— Maha Sports (@Maha_Sports) December 19, 2019