गुरुवारी (19 डिसेंबर) कोलकाता येथे आयपीएल 2020चा 13वा हंगामासाठी लिलाव पार पडला. या लिलावात वेस्ट इंडीजचा वेगवान गोलंदाज शेल्डन कॉट्रेलला (Sheldon Cottrell) किंग्ज इलेव्हन पंजाबने (Kings XI Punjab) 8.50 कोटी रुपयांना संघात सामील केले आहे.
यावर, माजी भारतीय क्रिकेटपटू गौतम गंभीर (Gautam Gambhir) म्हणाला की, ख्रिस मॉरिस (Chris Morris) आणि पॅट कमिन्स (Pat Cummins) यांचा लिलाव झाल्यानंतर पंजाबने काॅट्रेलला घेण्याची घाई केली.
मॉरिस आणि कमिन्स या लिलावात दोन महागडे खेळाडू गमावल्यानंतर पंजाब संघाचे प्रमुख संचालक अनिल कुंबळेकडे (Anil Kumble) फारसे पर्याय नसल्याचे गंभीर यांनी सांगितले. कॉट्रेलची गती 145 किमी पेक्षा अधिक असूनही अचूकता नाही, असे गंभीरचे मत आहे.
गंभीरने त्याचे मत मांडताना सांगितले की, शेल्डन काॅट्रेलला अजूनही अचूकतेवर काम करावे लागेल.
“कोणतेही चांगले पर्याय उपलब्ध नव्हते, पॅट कमिन्स आणि ख्रिस मॉरिस दोघेही विकले गेले होते. त्यांनी (ख्रिस) मॉरिसला मिळवण्यासाठी खूप मेहनत घेतली, पण त्याचा काही उपयोग झाला नाही. मला अजूनही असे वाटत नाही की शेल्डन काॅट्रेलकडे 8.50 कोटी रुपयांचा गोलंदाज होण्यासाठी पुरेसा दर्जा आहे,” असे गंभीर टाईम्स नाऊला दिलेल्या मुलाखतीत म्हणाला.
काॅट्रेलला 50 लाखांच्या मूळ किंमतीपेक्षा जवळजवळ 19 पटीने जास्त किंमतीवर विकत घेतले गेले आहे. काॅट्रेल सध्या भारताविरुद्ध 3 सामन्यांच्या वनडे मालिकेत व्यस्त आहे.
गुरुवारी आयपीएलच्या लिलावात मॉरिस आणि कमिन्स या दोघांनीही सर्वांचे लक्ष आपल्याकडे वेधले. कोलकाता नाइट रायडर्सने (Kolkata Knight Riders) कमिन्सला 15.50 कोटींच्या बोलीसह विकत घेतले. तर, दुसरीकडे ख्रिस मॉरिसला रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने 10 कोटी रुपयांना विकत घेतले.
ज्युनियर द्रविडचा फलंदाजीत राडा, केला सिनीअर द्रविडसारखाच कारनामा
वाचा👉https://t.co/gEemwhXIE6👈#म #मराठी @Mazi_Marathi @BeyondMarathi @MarathiRT #Cricket #SamitDravid— Maha Sports (@Maha_Sports) December 20, 2019
हे ४ मुंबईकर खेळाडू आयपीएल २०२०मध्ये खेळणार दिल्ली कॅपिटल्सकडून!
वाचा👉https://t.co/yAJbo8dM1t👈#म #मराठी @Mazi_Marathi @BeyondMarathi @MarathiRT #IPLAuction2020— Maha Sports (@Maha_Sports) December 20, 2019