आज 2020 आयपीएलसाठी कोलकाता येथे लिलाव सुरु आहे. आज 338 खेळाडूंचा लिलाव होणार आहे. यामध्ये आत्तापर्यंत पहिल्या सत्रातच मोठ्या बोली लागल्या आहेत. यामध्ये ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू क्रिकेटपटू ग्लेन मॅक्सवेल आणि वेगवान गोलंदाज पॅट कमिन्सला 10 कोटींपेक्षाही जास्त रकमेची बोली लागली आहे.
मॅक्सवेलला किंग्स इलेव्हन पंजाबने 10 कोटी 75 लाखांची बोली लावत संघात सामील करुन घेतले आहे. तर कमिन्ससाठी तब्बल 15 कोटी 50 लाखांची किंमत कोलकाता नाईट रायडर्सने मोजली आहे.
.@Gmaxi_32 is heading to @lionsdenkxip . He is sold for 10.75Cr 😮😮 #IPLAuction
— IndianPremierLeague (@IPL) December 19, 2019
WHAT WAS THAT? How fierce was that bid? @patcummins30 is sold to @KKRiders for 15.5Cr #IPLAuction 👏👏
— IndianPremierLeague (@IPL) December 19, 2019
मॅक्सवेल 2019 च्या आयपीएलमध्ये खेळला नव्हता. पण त्याआधी त्याने 2012 ते 2018 चे सर्व मोसम खेळले आहेत. त्याने आत्तापर्यंत आयपीएलमध्ये 69 सामने खेळताना 1397 धावा केल्या आहेत आणि 16 विकेट्स घेतल्या आहेत.
त्याचबरोबर कमिन्स आयपीएलमध्ये 2014, 2015 आणि 2017 च्या मोसमात खेळला आहे. त्याने आयपीएलमध्ये 16 सामन्यात 17 विकेट्स घेतल्या आहेत.
मुंबई इंडियन्सने सुरुवातीलाच खरेदी केला हा दिग्गज खेळाडूhttps://t.co/uHmsF44g8R#म #मराठी #Cricket @Mazi_Marathi @BeyondMarathi @MarathiRT #IPL2020Auction
— Maha Sports (@Maha_Sports) December 19, 2019
आज होणाऱ्या आयपीएल २०२० लिलावाबद्दल सर्वकाही…
वाचा👉https://t.co/5X0I0wKu1k👈#म #मराठी #Cricket @Mazi_Marathi @BeyondMarathi @MarathiRT #IPL2020Auction— Maha Sports (@Maha_Sports) December 19, 2019