आयपीएल २०२२ च्या १२ आणि १३ फेब्रुवारीला होणाऱ्या मेगा लिलावाची तयारी बेंगलोरमध्ये सुरु झाली आहे. तत्पूर्वी, या लिलावासाठी १२१४ खेळाडूंनी नोंदणी केली आहे. त्यामध्ये ३१८ परदेशी खेळाडूंचा सामावेश आहे. या खेळाडूंनी अपेक्षेप्रमाणे त्याची किंमतही ठरवली आहे. मेगा लिलावात भारतातील १७ खेळाडूंनी त्यांची मुळ किंमत २ कोटी रुपये ठेवली आहे. यापैकी अनेक खेळाडूंना लिलावात जास्त पैसे मिळतील हे निश्चीत आहे. मात्र, काही खेळाडूंना खरेदीदार मिळणेच कठीण आहे.
भारताचे असे काही खेळाडू आहेत ज्यांनी मागील काही हंगामात चांगली कामगिरी केलेली नाही. त्यामुळे त्यांना आयपीएलच्या २०२२ च्या मेगा लिलावात खरेदीदार मिळणे कठीण आहे. तसेच लिलावात या खेळाडूंना क्वचितच दोन कोटीला कोणी विकत घेतील. या लेखात आपण अशाच तीन खेळाडूंबद्दल जाणुन घेणार आहोत ज्यांना लिलावात खरेदीदार मिळणेच अशक्य आहे.
१.सुरेश रैना
आयपीएलमधील सर्वात यशस्वी खेळाडूंपैकी सुरेश रैना एक आहे. चेन्नई सुपर किंग्जच्या यशात त्याचे मोठे योगदान आहे. गेल्या काही वर्षांमध्ये रैना काही विशेष कामगिरी करु शकलेला नाही. या मेगा लिलावात त्याला २ कोटी रुपयांना खरेदी करण्यापुर्वी कोणतीही फ्रॅंचायझी दोनदा विचार करेल. २०२१ मध्ये १२ सामन्यात त्याने १७.७७ च्या सरासरीने १६० धावा केल्या होत्या. यादरम्यान विरोधी संघांनी त्याच्याविरुद्ध आखूड टप्प्याची गोलंदाजी केली व तो अशा चेंडूवर वारंवार बाद झाला. या कारणांमुळे त्याला आयपीएल २०२२ च्या लिलावात कोणी खरेदी करु शकेल याची शक्यता कमी आहे.
२. उमेश यादव
उमेश यादव एक शानदार गोलंदाज असून, आयापीएल २०२१ मध्ये त्याला खेळण्याची संधी मिळाली नाही. २०१८ च्या लिलावात त्याला राॅयल चॅलंजर्स बॅंगलोर संघाने ४.२ कोटी रुपयांना खरेदी केले होते. २०१९ मध्ये त्याने बेंगलोरकडुन खेळताना जास्त धावा दिल्या होत्या. त्याने शेवटच्या षटकांत चांगली कामगिरी केली नव्हती. २०२० मध्येही तो खास कामगीरी करु शकलेला नाही. २०२१ च्या आयपीएलमध्ये तो दिल्ली कॅपिटल्स या संघाचा भाग होता. पण, आवेश खान आणि कगिसो रबाडा यांच्यामुळे त्याला खेळण्याची संधी मिळाली नाही. आता यावर्षी त्याला कोणाही खरेदी करण्याची शक्यता कमी आहे. त्याने त्याची किंमत २ कोटी एवढी ठेवली आहे.
३. दिनेश कार्तिक
२०२१ पर्यंत कोलकत्ता नाईट रायडर्सचा भाग असलेल्या दिनेश कार्तिकला मेगा लिलावापुर्वी संघात कायम ठेवलेले नाही. गौतम गंभीरनंतर कार्तिकने दोन हंगाम कोलकत्ता संघाचे कर्णधारपद सांभाळले आहे. त्यानंतर ओएन माॅर्गन याला त्याच्याऐवज संघाचा कर्णधार बनवले. २०२१ मध्ये त्याने १७ सामन्यांत २२.३० च्या सरासरीने २२३ धावा केल्या होत्या. त्यामुळे त्याला या मेगा लिलावात कोण विकत घेईल याची शक्यता कमी आहे.
२ कोटी मूळ किंमत असलेले भारतीय खेळाडू
रविचंद्रन अश्विन, युझवेंद्र चहल, दीपक चाहर, शिखर धवन, श्रेयस अय्यर, दीनेश कार्तिक, इशान किशन, भुवेश्वर कुमार, देवदत्त पडिक्कल, कृणाल पांड्या, हर्षल पटेल, सुरेश रैना, अंबाती रायुडू, मोहम्मद शमी, शार्दुल ठाकूर, उमेश यादव.
महत्वाच्या बातम्या-
‘सुपर सब’ नासिरीची हॅट्ट्रिक! ‘कोलकाता डर्बी’मध्ये मोहन बागानची सरशी (mahasports.in)