गुरुवारी (19 डिसेंबर) आयपीएलचा लिलाव पार पडला. या लिलावात चेन्नई सुपर किंग्सने (Chennai Super Kings) पीयूष चावलाला (Piyush Chawla) 6.75 कोटी रुपयांना आपल्या संघात घेतले आहे.
कर्णधार एमएस धोनीसोबत (MS Dhoni) चावलाचे चांगले संबंध आहेत. तसेच, तो एक उत्कृष्ट गोलंदाजही आहे, असे चेन्नई सुपर किंग्सचे प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग (Stephen Fleming) यांनी गुरुवारी सांगितले.
चेन्नईमधील चेपाॅक स्टेडियमची (Chepauk Stadium) खेळपट्टी धीम्यागतीची असल्याने हा एक विचार करून घेतलेला निर्णय आहे, असे फ्लेमिंग म्हणाले.
“आम्ही चावलाला संघात घेण्यासाठी त्यावर बोली लावत होतो. त्याचबरोबर त्याचे कर्णधार एमएस धोनीशी चांगले संबंध आहे. तसेच, तो एक चांगला फिरकीपटू असल्याचे त्याने सिद्ध केले आहे. कर्ण शर्मापेक्षा (Karn Sharma) तो वेगळा गोलंदाज आहे,” असे फ्लेमिंग म्हणाला.
चेन्नई सुपर किंग्सपेक्षा चांगला संघ आणि एमएस धोनीपेक्षा चांगला कर्णधार कोणी नाही, असे चावला म्हणाला. चावला बराच काळ कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) संघात होता. परंतु, गेल्या महिन्यात कोलकाताने त्याला मुक्त केले होते.
“एक खेळाडू म्हणून तुम्हाला नेहमीच एका चांगल्या संघात राहायचे असते, एका चांगल्या कर्णधाराच्या नेतृत्वात खेळायचे असते. अशा परिस्थितीत आपल्याकडे चेन्नईपेक्षा चांगला संघ आणि माही भाईपेक्षा (धोनी)चांगला कर्णधार असू शकत नाही. मी यापेक्षा जास्त विचार करू शकत नाही,” असेही चावला म्हणाला.
चेन्नईच्या संघात हरभजन सिंग (Harbhajan Singh), इम्रान ताहिर (Imran Tahir) आणि रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) अशा दिग्गज या फिरकीपटूंचाही समावेश आहे. उल्लेखनीय गोष्ट अशी की चावला 2007च्या टी20 विश्वचषक (T20 World Cup) आणि 2011वनडे विश्वचषक (ODI World Cup) जिंकणार्या भारतीय संघाचा सदस्य होता.
त्याने भारताकडून 3 कसोटी सामने, 25 वनडे आणि 7 टी20 सामने खेळले आहेत. त्याने डिसेंबर 2012 मध्ये शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता.
ज्युनियर द्रविडचा फलंदाजीत राडा, केला सिनीअर द्रविडसारखाच कारनामा
वाचा👉https://t.co/gEemwhXIE6👈#म #मराठी @Mazi_Marathi @BeyondMarathi @MarathiRT #Cricket #SamitDravid— Maha Sports (@Maha_Sports) December 20, 2019
हे ४ मुंबईकर खेळाडू आयपीएल २०२०मध्ये खेळणार दिल्ली कॅपिटल्सकडून!
वाचा👉https://t.co/yAJbo8dM1t👈#म #मराठी @Mazi_Marathi @BeyondMarathi @MarathiRT #IPLAuction2020— Maha Sports (@Maha_Sports) December 20, 2019