आयपीएलच्या 14 व्या हंगामाची सर्व संघांकडून जय्यत तयारी सुरू झाली आहे. काही दिवसांपूर्वीच सर्व संघांनी आपल्या संघातून मुक्त केलेल्या खेळाडूंची यादी देखील जाहीर केली. स्टीव स्मिथ, ग्लेन मॅक्सवेल, ऍरॉन फिंच सारख्या स्टार खेळाडूंना संघांनी मुक्त असल्याने आगामी आयपीएल लीलावाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
आयपीएल लिलावाची तारीख देखील जाहीर करण्यात आली असून, 18 फेब्रुवारी रोजी चेन्नई येथे लिलाव प्रक्रिया पार पडेल. अशातच बातमी समोर येत आहे की या लिलाव प्रक्रियेत भाग घेणाऱ्या संघ व्यवस्थापनातील व्यक्तींना व मालकांना दोन वेळा कोरोना चाचणी करावी लागेल.
बीसीसीआयने स्पष्ट केले की लिलावाच्या दिवसाच्या 72 तास आगोदर संघमालक व इतरांनी आपली पहिली कोरोना चाचणी करावी. यानंतर लिलावाच्या दिवशी हॉटेलमध्ये पोहोचल्यावर काही वेळातच दुसरी कोरोना चाचणी केली जाईल. या चाचण्यांचे रिपोर्ट बीसीसीआयला सादर करणे आवश्यक असणार आहे. हे रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतरच आयपीएल लिलावात सहभाग घेता येणार आहे. प्रत्येक संघाने केवळ 13 व्यक्तींनाच लिलाव प्रक्रियेत सहभागी करून घेण्याची मर्यादा घालण्यात आली आहे.
बीसीसीआयने अजूनही स्पष्ट केले नाही की आयपीएल भारतात पार पडणार अथवा विदेशात. मात्र बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांनी वेळोवेळी माहिती दिली आहे की आयपीएल भारतातच पार पडण्यासाठी पूर्ण योजना आखल्या जात आहेत. कोरोनामुळे आयपीएल 2020 स्पर्धा युएई येथे खेळवली गेली होती. त्यामुळे जर भारतात आयपीएल स्पर्धा झाली नाही तर ती युएई येथे खेळली जाण्याची दाट शक्यता आहे.
आयपीएलच्या लिलावाचा विचार केला असता, किंग्ज इलेव्हन पंजाबकडे सर्वाधिक रक्कम शिल्लक आहे. पंजाब कडे 53.20 कोटी तर रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरकडे 35.90 कोटी रुपये बाकी आहेत. तसेच राजस्थान रॉयल्सकडे 34.85 कोटी रुपये आहेत. त्यामुळे या तीन संघांकडे सर्वोत्तम खेळाडूंना खरेदी करण्याची मोठी संधी असणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
आयसीसी वनडे रँकिंगमध्ये भारतीय खेळाडूंचा दबदबा कायम; विराट व रोहित आहेत ‘या’ क्रमांकावर
शुभमंगल सावधान! अष्टपैलू क्रिकेटपटू विजय शंकर अडकला विवाहबंधनात, पाहा फोटो
ऑगस्टमध्ये सुरू होणाऱ्या इंग्लंड दौऱ्यापूर्वी दोन भारतीय संघांमध्येच रंगणार सामने