इंग्लंड क्रिकेट संघाचा स्फोटक फलंदाज जॉस बटलरने त्याच्या कसोटी संघातील यशस्वी पुनरागमणाचे श्रेय आयपीएलला दिले आहे.
पाकिस्तानबरोबर पार पडलेल्या कसोटी मालिकेत बटलरने सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे. त्याने दोन सामन्यांच्या तीन डावात दोन अर्धशतके झळकावली आहेत. तर दुसऱ्या सामन्यात सामनावीराचा पुरस्कारही मिळवला.
पाकिस्तानच्या मालिकेनंतर पत्रकारांशी बोलताना बटलर म्हणाला की, “माझे कसोटी संघातील पुनरागमन माझ्या आयपीएलमधील कामगिरीच्या जोरावर झाले आहे. भारतातीय प्रेक्षकांसमोर एक विदेशी खेळाडू म्हणूण खेळणे खूप आव्हानात्मक असते. आयपीएलमधील माझ्या कामगिरीमुळेच माझ्यात आत्मविश्वास निर्माण झाला.”
जॉस बटलरने आयपीएलमधे राजस्थान रॉयल्सकडून खेळताना 13 सामन्यात 54.80 च्या सरासरीने 548 धावा केल्या आहेत. त्यामधे 95 या सर्वोच्च धावसंख्ये बरोबर 5 अर्धशतकांचा समावेश आहे. बटलरच्या एकहाती कामगीरीमुळे शेवटच्या क्षणाला राजस्थानला प्ले-ऑफमधे प्रवेश मिऴवता आला होता.
पुढे बोलताना बटलर म्हणाला की,” मी कसोटी संघात स्थान मिळवण्यासाठी गेली दोन वर्षे मेहनत घेतली आहे. मला संघातील माझे स्थान टिकवून ठेवण्यासाठी सातत्यपूर्ण कामगिरी करावी लागणार आहे.”
जॉस बटलरने 20 कसोटी सामन्यात 35 च्या सरासरीने 945 धावा केल्या आहेत. त्यामधे 8 अर्धशतकांचा समावेश आहे.